नागपूर : उद्या गुरुवारपासून नागपुरात सुरू होणारे हिवाळी अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालणार असले तरी प्रत्यक्षात १० दिवसच कामकाज होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने राज्य सरकारला चिमटा काढला आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूरला होत असताना पूर्वी तीन ते चार आठवडे अधिवेशन होत असे. मात्र, गेल्या काही वर्षात अधिवेशनाचा कालावधी कमी झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उद्या गुरुवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यानिमित्त नागपुरात महाराष्ट्र सरकार आणि विरोधी पक्षाचे सर्वच नेतेमंडळी दाखल होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून स्वागत फलक लावण्यात आला आहे. मात्र या स्वागत फलकावर असणारा मजकूर हा राज्य सरकारला चिमटा काढणारा आहे. प्रत्यक्ष अधिवेशन हे दोन आठवडे असले तरी कामकाज मात्र दहा दिवस चालणार आहे. त्यामुळे “फक्त १० दिवस होणाऱ्या अधिवेशनासाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत,” असा मजकूर असलेले भलेमोठे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून लावण्यात आले आहे.

हेही वाचा : हिवाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेस नेते नितीन राऊत उपोषणावर, कारण…

हे फलक विमानतळातून बाहेर निघणाऱ्या मार्गावर लावण्यात आले आहे. यावर शरद पवार तसेच राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे छायाचित्र आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग यांच्यासह शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे आणि जिल्हाध्यक्ष राजू राऊत यांचे छायाचित्र आहे.