नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात काहीही होऊ शकते, असे वक्तव्य करून राजकीय तर्कवितर्कांना सुरूवात करून २४ तास उलटत नाही तोच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत शनिवारी नागपूर दौ-यावर असताना पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही नेहमी संस्कार आणि संस्कृती पाळली आहे. सरकार जे चांगले काम करते, विरोधी पक्षाने त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीमध्ये जे काम सुरू केले, त्याची आम्ही स्तुती केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपनेच परंपरा मोडली

व्यक्तिगत शत्रुत्व न ठेवता राजकारण केले पाहिजे अशी परंपरा महाराष्ट्रात राहिली आहे. मात्र ती परंपरा दुर्दैवाने भाजपने मोडली होती, हे मान्य केलेच पाहिजे. आपल्या राजकीय विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले. ईडी सीबीआयचा गैरवापर केला, असे राऊत म्हणाले.

हेही वाचा : जगातील बारात ‘हा’ एकमेव भारतीय, नोबेल विजेत्याच्या नावे असलेला फेलोशिप सन्मान पटकावला

त्यांनी शिवसेना फोडली….

कोण कुठे जाणार, कोण कुठे येणार हे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस ठरवणार नाही. प्रत्येक पक्षाची एक भूमिका विचारसरणी असते. तुम्ही आमच्या पक्षाला तोडले आहे, ते कुठल्या विचारसरणी मध्ये बसते. जर राजकीय तुरुंगात टाकण्याची परंपरा तुम्ही सोडणार असाल तर आम्ही तुमचे स्वागत करू. मात्र आमचा संघर्ष त्यांच्याशी राहणार जोपर्यंत तुम्ही तानाशाही करणार, जोवर तुम्ही भ्रष्टाचारींना सोबत घेऊन सरकार चालवनार.असे राऊत म्हणाले.

२५ वर्ष आम्ही मित्रच होतो

कोणी कायमचा शत्रू आणि मित्र नसतोच. आम्ही २५ वर्ष मित्रच होतो. आम्ही भाजपचे सर्वात विश्वासपात्र मित्र होतो. मात्र आता मित्र राहिलो नाही. महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेते राहिले त्यांनी कधी सुडाचे राजकारण केले नाही. सेंट्रल एजेंसी चा वापर करून विरोधकांना तुरुंगवास भोगायला लावला नाही. याची सुरुवात महाराष्ट्रात भाजपने केली. ते आता सुधारणार असतील, पर्यावरणाचा संतुलन साधणार असतील तर आम्ही त्यांचा स्वागत करू, असे राऊत म्हणाले. महाराष्ट्राचे राजकीय वातावरण गढूळ असू नये असे आमचे प्रयत्न आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाकडून आम्हाला चांगल्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांना अशा लोकांनी घेरलं होतं त्या काळामध्ये, त्यांनी फडणवीस यांची प्रतिमा त्यांनी पूर्णपणे मलिन करून झाली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

कर्जमाफीचा भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख आहे. २१०० रुपये लाडक्या बहिणींना, कर्जमाफी शेतकऱ्यांना हे भाजपच्या जाहीरनाम्यात स्पष्ट लिहिलं आहे आणि त्या भाजपच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या अजित दादा त्या विरोधात बोलत असतील तर काय समजावं. त्यांना जाहीरनाम्यातील वचन पूर्ण करावे लागतील. नागपूर पासून मुंबई पर्यंत आम्ही स्वबळावर लढणार. एकदा आम्हाला पाहायच आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. मुंबई, ठाणे नागपूर मध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार. कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षानी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी पक्षाची भूमिका आहे, असे राऊत म्हणाले.

हेही वाचा : महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस

लोकसभेमध्ये इंडिया आघाडी स्थापन केली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन केली होती. आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक मध्ये कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. आम्ही नागपूर आणि मुंबई सह सर्व महापालिका मध्ये स्वबळावर निवडणूक लढवू, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur shivsena ubt leader sanjay raut praised cm devendra fadnavis cwb 76 css