नागपूर : अयोध्येतील मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणपतिष्ठ सोमवारी करण्यात येणार आहे. यानिमित्त संपूर्ण नागपूर शहर भगवे झाले आहे. ठिकठिकाणी श्रीरामाचे भव्य कटआऊट्स लावण्यात आले आहे. रस्त्यांवर कमानी लावण्यात आल्या असून ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानीही रामाचे भव्य कटआऊट्स लावण्यात आले आहे.
फडणवीस आज ( रविवारी) नागपुरात आहेत. ते सोमवारी अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा नागपुरातूनच दूरदृश्य प्रणालीव्दारे पाहणार आहे. रविवारी ते नागपुरातील विविध कार्यक्रमातही सहभागी झाले. रामटेकमध्ये आयोजित कार्यक्रमालाही त्यांनी हजेरी लावली. फडणवीस यांचे धरमपेठ भागात निवासस्थान आहे. हा संपूर्ण परिसर भगव्या झेंड्यांनी व्यापला आहे. त्यांच्या निवासस्थानी हाती धनुष्य घेतलेल्या रामाचे भव्य कटआऊट्स लावण्यात आले असून, घरावर भगवे झेंडेही लावण्यात आले आहेत.
हेही वाचा : नागपूर : शेवटच्या पाच सेकंदात सर्वाधिक अपघात! वाहतूक सिग्नलवरील धक्कादायक वास्तव
रोषणाई करण्यात आली आहे. याच परिसरातील झेंडा चौक संपूर्ण भगव्या कापडांनी सजवण्यात आला आहे. रामजन्मभूमी आंदोलनात फडणवीस सक्रिय होते. अयोध्येतील कारसेवेतही ते सहभागी झाले होते. तेथे जातानाचे छायाचित्रही त्यांनी ट्विट केले आहे. या छायाचित्रावर शिवसेनेचे संजय राऊत यांनी टीका केली. त्यालाही फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.