नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट पाचमधील कार्यालयात साप शिरला. त्यामुळे कार्यालयात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. एका पोलीस अधिकाऱ्याने सर्पमित्राला फोन केला. मात्र,त्याला येण्यास विलंब होत असल्यामुळे स्वत: पोलीस अधिकाऱ्यानेच त्या सापाला बरणीत पकडले आणि निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले. हा प्रकार आज गुरुवारी सकाळी घडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : धक्कादायक! खंडणी न दिल्यामुळे धावत्या रेल्वेसमोर फेकले…

गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे कार्यालय पागलखाना चौकाजवळ आहे. गेल्या काही दिवसांपासून या परीसरात साप निघत असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यामुळे पंकज भोपाळे नावाच्या अधिकाऱ्याने साप कसा पकडायचा याचे काही इंस्टाग्रामवरील रिल्स बघितले होते. गुरुवारी सकाळी बंदोबस्तासाठी जाण्याच्या तयारीत असताना कार्यालयात अचानक साप शिरला. कर्मचारी घाबरले मात्र, भोपाळे यांनी सर्पमित्रांना फोन केला. परंतु, सर्पमित्रांना पोहचण्यास बराच वेळ लागला. त्यामुळे भोपाळे यांनी एक बरणी घेऊन सापाला पकडले आणि निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur snake entered in crime branch police office police officer caught the snake adk 83 css