नागपूर : बाजारगावातील सोलार एक्सप्लोसीव्ह कंपनीत साप्ताहिक सुटीच्या दिवशी कामगारांना बळजबरीने बोलाविण्यात येत होते तसेच कामगारांना ‘ओव्हरटाईम’ करण्यासाठी भाग पाडण्यात येत होते. अतिरिक्त काम करण्यास नकार देणाऱ्या कामगारांना नोकरीवरून काढण्याची धमकी देण्यात येत होती. त्यामुळे अनेक कामगार नाईलाजास्तव बळजबरीने काम करीत असल्याची माहिती कंपनीबाहेर उभ्या असलेल्या काही कामगारांकडून मिळाली. सोलर कंपनीत झालेल्या स्फोटात ९ कामगार ठार झाल्यानंतर अशा अनेक बाबी समोर येत आहेत, हे विशेष.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चाकडोह परीसरातील सोलर एक्सप्लोसीव्ह कंपनीत आरडीएक्सच्या मिश्रणाचे पॅकिंग करीत असताना झालेल्या स्फोटा ९ मजूर ठार झाले. त्यानंतर कंपनीत काम करणारे शंभरावर कर्मचारी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जमले होते. मजुरांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीत पहिल्या पाळीत आठ तास काम केल्यानंतर कंपनीतील व्यवस्थापक आणि पर्यवेक्षक बळजबरीने दुसऱ्या पाळीतसुद्धा काम करण्याची सक्ती करतात. काम करण्यास नकार दिल्यास वेतन थांबवतात. अनेकदा ‘थंब पंचिंग मशिन’वर हजेरी लावण्यास प्रतिबंध घालतात. तसेच नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देतात. त्यामुळे कंपनीच्या मनमर्जीनुसार अनेक कामगारांना सलग १६-१६ तास काम करावे लागत होते.

हेही वाचा : नौदल नागरी परीक्षा ! भरली जाणार नऊशेवर पदे

अनेकदा कामगारांची इच्छा नसतानाही त्यांना काम करावे लागत होते. किरकोळ आजारी असतानाही काम करण्याची सक्ती करण्यात येत होती. महिलांना तर साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम करण्याची सक्ती केल्या जात होती. अतिरिक्त काम करण्यास नकार देणाऱ्या महिला कामगारांना मानसिक व शारीरिक त्रस्त करण्यात येत होते. काम करण्याची इच्छा नसतानाही काम करावे लागत असल्यामुळे कामगार कामात हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा करीत होते, अशी माहिती काही कामगारांकडून मिळाली. विशेष करून महिलांना साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम करण्याची सक्ती करण्यात येत होती. त्यांना किरकोळ रजासुद्धा देण्यास नकार देण्यात येत होता, अशीही माहिती काही कामगारांनी दिली.

हेही वाचा : अपघातवार! यवतमाळात २४ तासांत विविध पाच अपघातात सात ठार; भरधाव दुचाकी ठरतेय काळ…

अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल

सोलर कंपनीत झालेल्या स्फोटात ९ जण ठार झाल्यानंतर कोंढाळी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध ३०४ (अ) आणि २८६ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या स्फोटास जबाबदार कोण?, गुन्हा अज्ञात आरोपींविरुद्ध दाखल असल्याने आरोपींच्या पिंजऱ्यात कोण?, अशी चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनी सावध पवित्रा घेतला असून तपासात निष्पन्न झालेल्या आरोपींचा समावेश करण्यात येणार आहे. याबाबत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले की, तुर्तास अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला असून तपासाअंती निर्णय घेण्यात येणार आहे.