लोकसत्ता टीम

नागपूर : एक युवक कौटुंबिक कारणातून घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होता. ही माहिती अजनी पोलिसांना मिळाली. दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी लगेच त्या युवकाच्या घराकडे धाव घेतली. गळफास घेण्यापूर्वीच पोलिसांनी दरवाजा तोडून युवकाचा जीव वाचवला. ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजता अजनी रेल्वे क्वार्टरमध्ये घडली. ‘त्या’ युवकाचा जीव वाचवण्यात यश आल्याने अजनी पोलीस देवदूत ठरले आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
MLA Sandeep Kshirsagar On Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? पोलिसांवर दबाव आहे का? संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले

आणखी वाचा-“असावे घरकुल ठिकठिकाणी”, अमर काळे यांच्या संपत्तीचे विवरण असे…

अजनी रेल्वे कॉर्टरमध्ये राहणारे रवी बोरा हे तणावात होते. त्यांनी कौटुंबिक वादातून मंगळवारी रात्री नऊ वाजता त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अजनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांना फोनवरून माहिती मिळाली. त्यांनी लगेच पोलीस कर्मचारी दीपक धांडे आणि सूरज तिवारी यांना घटनास्थळावर पाठवले. दोन्ही कर्मचारी बंद दार तोडून आत शिरले व त्याचा जीव वाचवला. या कामगिरीची दखल पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी घेतली. बुधवारी दुपारी ठाणेदार तामटे, दीपक आणि तिवारी यांचे अभिनंदन करून सत्कार केला.

Story img Loader