नागपूर : मौजा रामाळा येथील शेतशिवारात धान कापणीसाठी गेलेल्या महिलेवर हल्ला करुन तिचा बळी घेणाऱ्या टी-१३ वाघिणीला मौजा मुलुरचक येथे जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व नेमबाज अजय मराठे यांच्या चमूने ही कामगिरी केली. मानव-वन्यजीव संघर्षात आतापर्यंत ६० वाघांना त्यांनी जेरबंद केले.

वाघिणीला जेरबंद करण्यासाठी सापळा रचून कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. अवघ्या तीन दिवसांत वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले. या वाघिणीला गोरेवाडा बचाव केंद्रात आणण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वनसंरक्षक एस. रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पार पडली. यावेळी वडसा उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक वनसंरक्षक संदिप भारती, वनपरिक्षेत्र अधिकारी पवनकुमार जोंग, अविनाश मेश्राम, क्षेत्र सहाय्यक राजेंद्र कुंभोर, अजय उरकुडे आदी सहभागी होते.

tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र

हेही वाचा : “आरक्षणासंदर्भात घाईत निर्णय घेता येत नाही”, मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया

तसेच वाघिणीला जेरबंद करणाऱ्या चमुमध्ये दिपेश टेंभूर्णे, योगेश लाकडे, गुरुनानक ढोरे, वसीम शेख, विकास ताजने, प्रफुल वाटगुरे, निकेश शेंदे, मनान शेख तसेच गडचिरोली जलद बचाव पथकातील आशिष भोयर, अजय कुकडकर, मकसुद सय्यद, गुणवंत बावनथडे, पंकज फरकाडे, निखील बारसागडे व इतर वनकर्मचारी उपस्थित होते.