नागपूर : एका कापड व्यावसायिकाने अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. दिनेश भंवरलाल जैन (३५) रा. कपिलनगर चौक, नारी रोड, असे मृताचे नाव आहे. दिनेश जैन यांचे कपड्यांचे दुकान आहे. त्यांची पत्नी गृहिणी असून त्यांना एक मुलगी आहे. शनिवारी सायंकाळी दिनेश घरून निघाले. पत्नीला बजाजनगर येथे राहणाऱ्या मावशीकडे जात असल्याचे सांगितले. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ते मावशीकडे न जाता अंबाझरी तलाव परिसरात पोहोचले.

हेही वाचा : ‘ते’ प्रवाशी मोठ्या आशेने दिवाळीसाठी गावी निघाले मात्र…

Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Man dies after cousin inserts compressor pipe in private parts
काही सेकंदाची मस्करी जीवावर बेतली; गुदद्वाराजवळ कम्प्रेसर पाईप नेल्याने तरुणाचा मृत्यू
Newlywed women commits suicide after argument with mother in law over using sanitary pads
‘सॅनिटरी पॅड’वरुन वाद झाल्याने नवविवाहित सुनेची आत्महत्या
bhandara blast 8 died
भंडारा आयुध निर्माणीत स्फोट; आठ ठार
Eyewitnesses said they could hear sounds of workers buried under rubble after explosion in bhandara
स्फोटानंतर एक तास मलब्या खाली दबलेल्या लोकांचे येत होते आवाज… ‘मला बाहेर काढा…’
Former MP Kisanrao Bankheles son commits suicide
माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या मुलाची आत्महत्या
Andhra College Student Jumps Off 3rd Floor
Viral Video : शिक्षकासमोरच वर्गातून उठून बाहेर गेला अन् गॅलरीतून मारली उडी; विद्यार्थ्याची ऑन कॅमेरा आत्महत्या

काही वेळ काठावर उभे राहिल्यानंतर अचानक तलावात उडी घेतली. तलावावरील उपस्थित नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोहणाऱ्यांनी त्यांना तलावातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारार्थ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दिनेश यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Story img Loader