लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर: दोन वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवल्यानंतर प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार मारहाण करणाऱ्या प्रियकराला कंटाळून प्रेयसीने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. तिच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरु आहेत. रोहित सोळंके असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
१९ वर्षीय तरुणी बेसा-घोगलीत राहते. रोहित आणि तिचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, रोहित तिच्यावर सलग अन्याय अत्याचार करीत होता. तिला बळजबरी फिरायला नेत होता. तिचा वारंवार छळ करीत होता. तसेच तिचे अन्य युवकाशी प्रेमसंबंध असल्याचे सांगून तिच्यावर संशय घेत होता. त्यामुळे तरुणी कंटाळली होती. यापूर्वी रोहितने तिला अनेकदा मारहाण केली. तिने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी दिल्या.
हेही वाचा… देशभरातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; गोंदियाच्या ठगबाजावर ‘मनी लाँडरिंग’चा गुन्हा
मात्र, हुडकेश्वर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे आरोपी रोहितची हिम्मत वाढली. त्याने गेल्या दोन दिवसांपूर्वी तिच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण केली. त्यामुळे तरुणीने सोमवारी सकाळी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला कुटुंबीयांनी मेडिकल रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.