लोकसत्ता टीम

नागपूर: सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांना महापालिकेच्या उपद्रवी शोध पथकाने चांगलाच दणका दिला आहे. गेल्या पाच वर्षांत अशा २ हजार ६५२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७ लाख ८५ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वाधिक कारवाई नेहरूनगर झोनअंतर्गत ४३७ लोकांवर करण्यात आली.

Nana Patole criticizes government and law and order in state after attacked on saif ali khan in his house
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
Nagpur Bharosa Cell , Nagpur , Bharosa Cell,
नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’
Four dead in Gujarat due to kite string injuries
नायलॉन मांजामुळे सात जणांचा मृत्यू; मुंबईत १९ जणांविरोधात कारवाई
Erandwane, pistol , revenge, youth arrested,
पुणे : बदला घेण्यासाठी पिस्तूल बाळगणारा गजाआड, एरंडवणेतील डीपी रस्त्यावर गुन्हे शाखेची कारवाई
75 percent of crimes detected in Thane in last year
ठाण्यात गेल्या वर्षभरात ७५ टक्के गुन्हे उघडकीस
illegal constructions Mumbai
मुंबई : अनधिकृत बांधकामांवर २०० टक्के दंड, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश

शहराला स्वच्छ, सुंदर करण्यासाठी महापालिकेद्वारे विविध उपाययोजना राबवल्या जातात. परंतु, उघड्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांच्या वागणुकीत काहीच फरक पडताना दिसत नाही. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाईची माेहीम राबवली जात आहे. २०१७ ते २०२३ या पाच वर्षात २ हजार ६५२ लोकांवर कारवाई करण्यात आली. सी २० परिषदेच्या निमित्ताने शहरातील विविध भागात ई-टॉयलेट निर्माण करण्यात आले. शिवाय रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध भागात स्वच्छता गृह बांधण्यात आले. मात्र त्यातही अस्वच्छता आहे. त्यामुळे लोक स्वच्छतागृहाबाहेर लघुशंका करतात.

प्रत्येक भागात ई-टॉयलेट हवे

उघड्यावर किंवा कुठेही लघुशंका करणे चुकीचेच आहे. परंतु, महापालिकेने शहरातील वर्दळीच्या ठिकाणी किंवा अन्यत्र स्वच्छतागृह किंवा ई-टॉयलेटची सोय केली पाहिजे. विशेषत: शहरातील ज्येष्ठ नागरिकांची मोठी कोंडी होते. त्यामुळे महापालिकेने प्रत्येक भागात ई-टॉयलेट निर्माण केले आणि त्यात स्वच्छता ठेवली तर उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल. – अभिजित चंदेल, सिटीझन फोरम.

नागरिकांनी शिस्त पाळावी

उपद्रवी शोध पथकाच्या माध्यमातून उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना दंड केला जातो तो त्यांना शिस्त लावण्यासाठी. नागरिकांनी स्वच्छतेची शिस्त पाळली पाहिजे. – वीरसिंग तांबे, उपद्रवी शोध पथक प्रमुख, महापालिका.

Story img Loader