लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर: सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांना महापालिकेच्या उपद्रवी शोध पथकाने चांगलाच दणका दिला आहे. गेल्या पाच वर्षांत अशा २ हजार ६५२ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७ लाख ८५ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वाधिक कारवाई नेहरूनगर झोनअंतर्गत ४३७ लोकांवर करण्यात आली.
शहराला स्वच्छ, सुंदर करण्यासाठी महापालिकेद्वारे विविध उपाययोजना राबवल्या जातात. परंतु, उघड्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांच्या वागणुकीत काहीच फरक पडताना दिसत नाही. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाईची माेहीम राबवली जात आहे. २०१७ ते २०२३ या पाच वर्षात २ हजार ६५२ लोकांवर कारवाई करण्यात आली. सी २० परिषदेच्या निमित्ताने शहरातील विविध भागात ई-टॉयलेट निर्माण करण्यात आले. शिवाय रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध भागात स्वच्छता गृह बांधण्यात आले. मात्र त्यातही अस्वच्छता आहे. त्यामुळे लोक स्वच्छतागृहाबाहेर लघुशंका करतात.
प्रत्येक भागात ई-टॉयलेट हवे
उघड्यावर किंवा कुठेही लघुशंका करणे चुकीचेच आहे. परंतु, महापालिकेने शहरातील वर्दळीच्या ठिकाणी किंवा अन्यत्र स्वच्छतागृह किंवा ई-टॉयलेटची सोय केली पाहिजे. विशेषत: शहरातील ज्येष्ठ नागरिकांची मोठी कोंडी होते. त्यामुळे महापालिकेने प्रत्येक भागात ई-टॉयलेट निर्माण केले आणि त्यात स्वच्छता ठेवली तर उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल. – अभिजित चंदेल, सिटीझन फोरम.
नागरिकांनी शिस्त पाळावी
उपद्रवी शोध पथकाच्या माध्यमातून उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांना दंड केला जातो तो त्यांना शिस्त लावण्यासाठी. नागरिकांनी स्वच्छतेची शिस्त पाळली पाहिजे. – वीरसिंग तांबे, उपद्रवी शोध पथक प्रमुख, महापालिका.