नागपूर : एका चोरट्याने अनेक ठिकाणी घरफोड्या केल्या. चोरलेले दाग-दागिने विकून त्याने चक्क कार घेतली. कार घेऊन ऐटीत फिरायला लागला. मात्र, घरफोडी करण्यासाठी कारने टेहळणी करताना चोरट्याला पोलिसांनी पकडले. त्याने चोरीच्या पैशातून मौजमजा करायला कार घेतल्याची कबुली दिली. संदीप टेंभरे (२४) रा. हुंडा, मध्यप्रदेश असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ६ लाख ५० हजार रुपये किंमतीची कार जप्त करण्यात आली.

वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत राहणाऱ्या फिर्यादी प्रियंका जांगडे (३१) या बाहेरगावी गेल्या असताना आरोपीने घरफोडी करीत ४ लाख २३ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरले. त्यानंतर जिजामाता नगरातील संजय नाकाडे (४४) यांच्या घरी चोरी केली. तसेच हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत घरफोडी करीत ओम शर्मा रा. गंगाबाई घाट याच्या मदतीने संपूर्ण मुद्देमाल तुषार कावडे रा. लालगंज याला विकला. मिळालेल्या पैशात त्याने साडेसहा लाखांची कार खरेदी केली आणि कारने ऐटीत फिरत होता. चोरी करण्यासाठी तो कारने टेहळणी करायला जाऊ लागला.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर
Two brothers from the village farmed saffron together Earn lakhs of rupees
Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये
Dawood t-shirt, Lawrence Bishnoi t-shirt,
दाऊद, लॉरेन्स बिष्णोईचे टीशर्ट विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल; महाराष्ट्र सायबर पोलिसांची कारवाई

हेही वाचा : धोकादायक ‘मेडीगड्डा’ धरणामुळे दोन राज्यांतील नागरिकांचा जीव टांगणीला! राजकीय आरोप- प्रत्यारोप

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर संबधित पोलीस ठाण्यातील कर्मचारी तसेच गुन्हे शाखेचे घरफोडी विरोधी पथक समांतर तपास करीत होते. गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले. चोरीच्या पैशातून कार खरेदी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणात चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी मदत करणारा आणि खरेदी करणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.