नागपूर : बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी आणि उद्योगांना आवश्यक कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी शासन आणि उद्योगसमूह, प्लेसमेंट संस्थेत सामंजस्य करार रविवारी (१७ सप्टेंबर) दुपारी २ वाजता इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या परिसरातील गुरुनानक भवन येथे ‘इंडस्ट्री मिट’ च्या माध्यमातून होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित राहतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : गडकरी आता जुने जोडे-चप्पल गोळा करणार, योजना काय वाचा..

याप्रसंगी कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अप्पर मुख्य सचिव, कौशल्य विकास आयुक्त, विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी उपस्थित राहतील. ‘कौशल्य केंद्र आपल्या दारी’ या संकल्पनेतून नागपूर विभागातील विविध नामांकित उद्योग, उद्योजक संघटना व प्लेसमेंट एजन्सीज यांचेसोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्यातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जाणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur today inauguration of industry meet by deputy cm devendra fadnavis for unemployed youth mnb 82 css
Show comments