नागपूर : गणेशोत्सवाची धामधूम संपत नाही तोच सोमवारपासून विदर्भात विविध ठिकाणी हाडपक्या (मस्कऱ्या) गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. नागपुरातील सिनियर भोसला पॅलेसमधील हाडपक्या गणपतीला २३६ वर्षांचा इतिहास आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या निमित्ताने दहा विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवामध्ये जे काही पारंपरिक उत्सव साजरे केले जातात त्यात मारबतीच्या मिरवणुकीला जसा ऐतिहासिक वारसा आहे, तसाच वारसा आणि परंपरा या मस्कऱ्या गणपती उत्सवाला आहे. गणेशोत्सव आटोपल्यानंतर आता सोमवारी चतुर्थीला नागपूरसह विदर्भात उमरेड, मौदा, कामठी, भिवापूर, वर्धा, खापरखेडा, काटोल कळमेश्वर, कुही, मांढळ आदी गावांमध्ये मस्कऱ्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महालातील सिनियर भोसला पॅलेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हाडपक्या गणपती उत्सव साजरा केला जातो. इ.स. १७५५ मध्ये श्रीमंत राजे खंडोजी महाराज भोसले उपाख्य चिमणाबापू यांनी या उत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सवाचा इतिहास सांगताना श्रीमत राजे मुधोजी भोसले यांनी सांगितले, शूर लढवय्ये राजे खंडोजी महाराज भोसले हे अन्यायाच्या विरोधात लढत असताना ते बंगालच्या स्वारीवर गेले. बंगालवर विजय मिळवला व स्वारीहून परत येत असताना कुळाचाराच्या घरगुती गणपतीचे विसर्जन झाले होते.

हेही वाचा : गडचिरोली पोलिसांचा तस्करांना दणका

बंगालवर विजय मिळवल्याचा आनंद उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने पितृपक्षात मस्कऱ्या गणपती प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या उत्सवाला सार्वजानिक रूप १७५५ मध्ये राजे खंडोजी महाराजांनी दिले आणि तेव्हापासून आजतागायत हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला २५८ वर्षे झाली आहे. २००५ पासून सिनियर भोसला पॅलेसमध्ये हा उत्सव होत आहे. हाडपक्या गणपती नवसाला पावतो अशी ख्याती पूर्वीपासून सांगण्यात येते. दहा दिवस होणाऱ्या या उत्सवात विविध कला प्रकार, लावण्या खडी गंमत यासारखे कार्यक्रम होऊ लागले.

हेही वाचा : अभ्युदय योजनेत गावे होणार आदर्श आणि चकाचक

१७५५ मध्ये या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्यात आले. श्रीमंत राजे खंडोजी महाराजांनी चालू केलेली ही प्रथा आजही सुरू आहे. मध्यंतरी हा उत्सव घरगुती वातावरणात साजरा करण्यात येत होता. मात्र २००५ पासून महालातील सिनियर भोसला पॅलेसमध्ये हा उत्सव साजरा केला जात आहे. २००५ पासून १२ हाताची ३.५ फुटाची मूर्ती पूजेसाठी ठेवण्यात येत होती. मूळ गणेशाची मूर्ती शिवाजी महाराजांच्या रुपात सात फुटाची स्थापित केली जाते. नवसाला पावणारा गणपती असल्याची ख्याती असून दहा दिवसात हजारो लोक दर्शनासाठी येत असतात.

हेही वाचा : अल्पवयीन पीडितेचा अमानवीय छळ प्रकरण: ‘त्या’ मुलीवर सख्ख्या भावानेही केला बलात्कार

महालातील झेंडा चौक परिसरात शहीद शंकर महाले यांच्या पुतळ्याजवळ गेल्या अनेक वर्षांपासून हाडपक्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षीसुद्धा मोठय़ा प्रमाणात उत्सव साजरा केला जाणार आहे. माजी महापौर दिवं. सखाराम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली या उत्सवाला प्रारंभ करण्यात आला होता. दहा दिवस होणाऱ्या या उत्सवात विविध लोककला प्रकार सादर केले जातात. नंदनवन, मानेवाडा, इतवारी, झिंगाबाई टाकळी, जयताळा या भागात मस्कऱ्या गणपती उत्सव साजरा केला जातो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur tomorrow installation of hadpakya also known as maskarya ganesh idol having 236 year old history vmb 67 css