नागपूर : खासदार महोत्सवात पार्श्वगायिका श्रेया घोषाल हिच्या कार्यक्रमाला शहरभरातून नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे क्रीडा चौकाकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर जवळपास दोन तासांची वाहतूक कोंडी निर्माण झाली. अनेक वाहनचालकांमध्ये वाहन काढण्यावरून बाचाबाची झाली तर वाहतूक पोलिसांनाही परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले नाही. श्रेया घोषाल हिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात नागपुरात आहे. खासदार महोत्सवात श्रेयाला ऐकण्यासाठी तुंबळ गर्दी उसळली होती. तसेच कार्यक्रमस्थळासमोर मोठमोठ्या डिजीटल टीव्ही स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. जागा न मिळाल्याने किंवा पासेस नसणाऱ्यांनी स्क्रिनवर आनंद घेतला. अनेक जण रस्च्यावरच वाहनावरूनच कार्यक्रम बघत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : जम्मू-काश्मीरमधून पळून आलेले प्रेमीयुगुल पोलिसांच्या ताब्यात

कार्यक्रम संपताच मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर निघाली. त्यामुळे क्रिडा चौकातून जाणाऱ्या सहाही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे वाहतूक नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांची चांगलीच भंंबेरी उडाली. वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त चेतना तिडके यांना वाहतुकीचे नियोजन न करता आल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे अनेक नागरिकांना महिला व मुलांसह रस्त्यावर तास-दोनतास अडकावे लागले. अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.