नागपूर: वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, हैदराबाद या शहरातून नागपुरात प्रवेश करण्यासाठी ऐकमेव पर्याय असलेला वर्धा मार्गावरील चिंचभवन रेल्वे उड्डाण पुलावरील चार महिन्यांपासून बंद असलेला एक मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे पुलावरील वाहनकोंडी कमी होणार आहे.

नागपूर -वर्धा रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी चिंचभवनच्या जुन्या उड्डाण पुलावरील वाहतूक चार महिन्यांपूर्वी बंद केली होती. व वाहतूक नवीन पुलावरून वळवण्यात आली होती. त्यामुळे नवीन पुलावर नागपुरातून बाहेर जाणारी आणि बाहेरून येणाऱ्या वाहनांची एकच गर्दी होत होती. अनेकदा वाहतूक कोंडी होत होती. नागपूर बाहेरुन येणाऱ्या रूग्णवाहिका उड्डाण पुलावर अडकून पडत होत्या. रेल्वे रूळ रूंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर जुन्या पुलावरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला. अधिवेशन काळात होणारी वाहतूक कोंडी यामुळे टळणार आहे.

हेही वाचा : “राष्ट्रवादीमुळे आघाडी सरकार पडलं”, पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपाला प्रफुल्ल पटेल यांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…

मोर्चेकऱ्यांना फायदा

नागपूरमध्ये डिसेंबरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. अधिवेशनानिमित्त अनेक मोर्चे निघतात. त्यासाठी राज्यभरातून लोकं खासगी वाहनाने येतात. त्यांच्या मार्गात चिंचभवनचा जुना पुल बंद असणे अडथळा ठरले असते. अधिवेशनाच्या पूर्वीच तो वाहतुकीसाठी खुला केल्याने मोर्चेकऱ्यांनी वाहने नागपुरात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Story img Loader