नागपूर : एकदा नाही तर दोनदा ते आईपासून वेगळे झाले. चिमुकले जीव.. त्यांना काय करावे, कुठे जावे काहीच कळत नव्हते. त्यांची नजर आईला सैरभैर शोधत होती. शेवटी वन्यजीवप्रेमी आणि वनखात्याच्या चमूने त्यांना त्यांची आई मिळवून दिली. गुरुवार, १५ फेब्रुवारीला कराड तालुक्यातील मालखेड येथे रामचंद्र ज्ञानू मोरे यांच्या कूळकी नामक शिवारात ऊसतोड सुरू असताना सायंकाळी पाचच्या सुमारास बिबट्याचे दोन बछडे सरीमध्ये सापडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोरे यांनी तत्काळ सरपंच सुरज पाटील व पोलीस पाटील इंद्रजीत ठोंबरे यांना बिबट्याचे बछडे असल्याबाबत कळवले. त्यांनी पुढे कराड वनपाल आनंद जगताप यांना सांगितले. वनविभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोन बछडे ताब्यात घेतले. अलीकडेच सात फेब्रुवारिला सुद्धा कालच्या शिवरापासून सुमारे ८०० मीटर अंतरावर दोन बछडे सापडले होते. त्यांचे त्याच दिवशी मादी सोबत मीलन घडवून आणण्यात वनविभाग यशस्वी झाले होते. तीच बछडे पुन्हा काल मोरे यांच्या शेतात सापडले.

हेही वाचा : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची सभा १८ फेब्रुवारीलाच का ? जाणून घ्या या दिवसाचे ऐतिहासिक महत्व

मादी बिबट्या त्या दरम्यान शेजारी असल्याची खात्री होती. तत्काळ साडेसहा वाजता “वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्स” कराड यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. विशिष्ट प्रकारे बछडे सापडलेल्या ठिकाणी विशेष कॅमेरे लाऊन बछडे क्रेटमध्ये ठेवण्यात आले. मादी रात्री आठ ते अकरा दरम्यान दोन वेळा बछड्याजवळ घुटमळून गेली. शेवटी रात्री ११.४७ ला पुन्हा आली व दोन्ही बछड्यांना सुखरूप घेऊन गेली.

वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर्स कराड टीमने यशस्वीपणे पुनर्मिलन घडवून आणले. सदर कामात वनक्षेत्रपाल तुषार नवले , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे , वनपाल आनंद जगताप , वनरक्षक कैलास सानप, अभिजित शेळके आणि चालक हणमंत, तर वाईल्ड लाईफ रेस्कुयूअर्स कराड टीमचे रोहीत कुलकर्णी, गणेश काळे, अजय महाडीक, रोहीत पवार, सचिन मोहिते, अनिल कोळी या सर्वांनी मोलाची भूमिका पार पाडली.

हेही वाचा : आयुर्वेद, होमिओपॅथीलाही आंतरवासिता वाढीव विद्यावेतन!

वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्स कराड टीमने गेल्या तीन महिन्यात सहा विविध घटनांमध्ये कराड तालुक्यातील विविध ठिकाणी सापडलेली बिबट्या बछडे तीन वेळा, वाघटी (रस्टी स्पोटेड कॅट) पिल्ले दोन वेळा , रान मांजर पिल्ले एकदा यांचे त्यांच्या मादी (आई) सोबत यशस्वीपणे पुनर्मिलन घडवले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur two cubs of leopard finally found their mother due to wild life rescuers rgc 76 css
Show comments