नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट व इतर विरोधी पक्षांनी मिळून धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाविरुद्ध रविवारी मुंबईत मोर्चा काढला होता. त्या मोर्चावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेणाऱ्यांना सुनावले आहे. ठाकरे म्हणाले, मी प्रश्न अदानींना विचारले, उत्तर त्यांचे चमचे देत आहेत. विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आम्ही मुंबईतून नाही तर चंद्राहून माणसे आणली. या मोर्चात फक्त भाजप नव्हती. ते असते तर सेटलमेंट झाले असते.’ मुंबई विकण्यासाठी काही लोक अदानींची चमचेगिरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्या दिल्ली येथे जाणार आहे. बैठकीचा अजेंडा उद्या कळेल, असेही त्यांनी सांगितले.

आमच्याकडे भाजपच्या मंत्र्यांबाबत पुरावे आहेत, मग एसआयटी का नाही? सलीम कुत्ता संदर्भात आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत विषय मांडताच एसआयटी लावली. पण, याच कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन नाचतानाचा पुरावा आमच्याकडे आहे. हे पुरावे सभागृहात दाखविल्यानंतरही सरकार आम्हाला बोलू देत नाही. आमच्याकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारे एसआयटी लावण्यात यावी, असे ठाकरे म्हणाले. सरकारने मराठा आरक्षण कसे देता येईल, हे सांगावे. तसेच कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर सरकारच्या भूमिकेला आमचा पाठिंबा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

raj Thackeray Asilata Raje
Raj Thackeray : स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात आहे राज ठाकरेंची बालमैत्रीण, म्हणाले, “आम्ही शिशूवर्गापासून…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Raj Thackeray kalyan Rural
Raj Thackeray Speech : “काकांनी डोळे वटारले अन् लगेच…!” सकाळच्या शपथविधीवरून राज ठाकरेंचा अजित पवारांना चिमटा
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…
raj thackeray sada sarvankar Amit Thackeray
“सरवणकरांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती कधीच केली नाही”, मनसेचा चिमटा; म्हणाले, “त्यांचे दोन्ही पाय…”
Uddhav Thackray Warns to Independent Candidates to take Back The Name
Uddhav Thackeray : “अपक्ष किंवा बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाहीत तर…”, उद्धव ठाकरेंचा इशारा
sada sarvankar marathi news
अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा? सदा सरवणकरांचे माघारीचे संकेत? म्हणाले, “कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय…”
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”

हेही वाचा : पत्रकार परिषदेस आमदार कांबळे यांचा पाचव्यांदा ठेंगा

पंतप्रधान फक्त गुजरातचेच आहेत का?

गुजरातध्ये सूरत डायमंड बोर्स सुरू झाला आहे. त्याचा फटका मुंबईतील हिरे व्यवसायाला बसला आहे. पंतप्रधान महाराष्ट्राची आर्थिक राजधानी गुजरातला हलविण्याच्या मार्गावर आहेत. ते त्यांच्या भाषणातसुद्ध गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होईल, असे म्हणतात. ते केवळ गुजरातचेच आहेत का, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.