नागपूर : ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे दोन सदस्यीय पथकाने येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्राची पाहणी केली व संक्रमित कोंबड्याच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक औषधांची मात्रा देण्याची सूचना केली.

या पथकात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पशू आरोग्य साथरोग तज्ज्ञ डॉ. प्रभाकर झा, सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ डॉ. कमलेश किराड यांचा समावेश आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे सहसंचालक डॉ. नवीन सारंग आणि श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. ज्योती हे दोन सदस्य पोहचले नाहीत. संक्रमित कोंबड्यांच्या ठिकाणी सलग दहा दिवस कीटकनाशक फवारणी करा, इतर पशुपक्षी मृतावस्थेत आढळल्यास त्यांचेही नमुने तातडीने तपासण्याची सूचना यावेळी करण्यात आली. पथकासोबत नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, डॉ. जोशी यांच्यासोबत जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाचेही काही अधिकारी उपस्थित होते.

Tandoori chicken
Tandoori Chicken: तंदुरी चिकन कसं ठरलं जगातलं सर्वोत्तम ग्रिल्ड चिकन?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Chicken tikka easy version recipe chicken starter easy recipe
Chicken Tikka Recipe: नॉन व्हेजचा बेत आखताय? मग अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘चिकन टिक्का’, झटपट होईल रेसिपी तयार
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Panje Dongri wetlands, Uran, dry
उरण : आंतरभरती प्रवाह बंद झाल्याने पाणजे पाणथळ कोरडी
Fight between dog and cock people surprise after result dog scared from this bird watch viral video
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” एवढ्याशा कोंबड्यानं कुत्र्याची काय अवस्था केली पाहाच
bird was happy to see the little girl
चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO

हेही वाचा…चंद्रपूर: वडेट्टीवारांनी लोकसभेसाठी मुलीचे नाव समोर केले! काँग्रेसच्या वर्तुळात…

कोंबड्या नष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही विचारणा

सदर केंद्रातील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचे संक्रमन आढळल्यावर येथील ८ हजार ५०१ कोंबड्या, १६ हजार ७७४ अंडी, ५ हजार ४०० किलो पक्षी खाद्य नष्ट करण्यात आले. या कामासाठी शहराबाहेरील १६ चमूमध्ये सुमारे ८० कर्मचारी आल्याचे केंद्रीय पथकाला सांगण्यात आले. त्यावर पथकाने या सगळ्या कर्मचाऱ्यांची माहिती घेत त्यांचेही नियमित दहा दिवस सर्व्हेक्षण करून त्यांनाही लक्षणे दिसताच त्यांचे नमुने तपासणीला पाठवण्याच्या सूचना केल्या.