नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि वाघांचे सहज होणारे दर्शन यामुळे देशविदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने इकडे येत आहेत. येथील वाघही पर्यटकांना निराश करत नाही. आतापर्यंत पर्यटकांचा ओढा ताडोबाच्या गाभा क्षेत्रातील पर्यटनाकडे होता. मात्र, आता ताडोबाचे बफर क्षेत्र पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहेत. या बफरमधील वाघांच्या करामतींनी पर्यटकांना लळा लावला आहे. असाच एक व्हिडिओ पर्यटकांनी निमढेला बफर क्षेत्रात टिपला आहे. ज्यात दोन वाघ पर्यटकांची तमा न बाळगता मस्ती करत आहेत.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील निमढेला बफर क्षेत्रातील वाघ सध्या पर्यटकांना त्यांच्याकडे खुणावत आहेत. कधी येथील वाघ मंदिरातील देवासमोर नतमस्तक होतो, तर कधी तो पर्यटकांसाठी असलेल्या निवाऱ्याच्या छतावर चक्कर मारतो. कधी इथल्या वाघांचे बछडे मस्ती करतांना दिसतात. असाच एक व्हिडिओ डेक्कन ड्रिफ्टसचे प्रमुख व वन्यजीव अभ्यासक पीयूष आकरे, कंचन पेटकर आणि शेखर मल्लले यांनी टिपला. ताडोबाच्या निमढेला बफर क्षेत्रात “भानुसखिंडी” वाघिणीची मुलगी “नयनतारा” आणि “डेडली बॉईज” हे सूर्य मावळतीला आला असतांना मस्ती करताना आढळून आले.

Loksatta Ganeshotsav Quiz
लोकसत्ता गणेशोत्सव क्विझच्या विजेत्यांचा सन्मान
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
tiger's Viral Video
‘शिकार करो या शिकार बनो’, बैलाची शिकार करण्यासाठी वाघाचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Morning walk of tiger family in Pench tiger project video goes viral
‘मॉर्निंग वॉक’ करताय! पण वाघाचे कुटुंब…
Farmer desi jugaad video farmer jugaad to protect maize field from pig goes viral watch video
शेतकऱ्यांचा नाद करायचाच नाय; डुक्करांपासून संरक्षण करण्यासाठी ढासू जुगाड; Video एकदा पाहाच
Tadoba Andhari Tiger Reserve, Chhota Matka, tiger
Video : ताडोबातील ‘छोटा मटका’ झाडांवर नखाने ओरबाडत होता अन्…
mother and children love
‘माझ्या आईसारखे शूर जगात कोणी नाही…’ लेकराला वाचविण्यासाठी सिंहाबरोबर केला सामना; थरारक VIDEO पाहून फुटेल घाम
The lion caught the person's head in its jaws
‘एक चूक अन् खेळ खल्लास’; सिंहाने व्यक्तीचं डोकं जबड्यात पकडलं अन् पुढे जे घडलं… VIDEO पाहून भरेल धडकी

हेही वाचा : सोयाबीनची उत्पादकता अधिक, नाफेडकडून खरेदी मात्र मर्यादित; शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

निमढेल्यातील “नयनतारा” वाघिणीचे डोळे निळे आणि अतिशय आकर्षक आहेत. त्यावरूनच पर्यटकांनी तिला “नयनतारा” असे नाव दिले. सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. सायंकाळी ते पहाटेपर्यंत हलकी थंडी तर दिवसभर मात्र उकाडा.

हा उकाडा संपून थंड वाऱ्याची झुळूक येताच “नयनतारा” व “डेडली बॉईज” यांची मस्ती सुरू झाली. तब्बल दहा मिनिटे पर्यटकांनी हा क्षण डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवला.