नागपूर : मराठा समाजाला आराक्षण देण्याचा विषय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढे आणला होता आणि त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिले होते. त्यामुळे आज हा समाज रस्त्यावर आला आहे. त्याचवेळी मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही, असे जर सांगितले असते आणि सिद्ध केले असते तर आज एवढा विषय चिघळला नसता. फडणवीस केवळ आश्वासन देऊन समाजाची दिशाभूल करत असल्याची टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विजय वडेट्टीवार हे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. जरांगे पाटील यांनी मागणी केली की आरक्षण जाहीर केले जाईल, असे नाही. उलट जरांगेना सरकारने वेळ देऊन फसवणूक का केली? असा प्रश्न उपस्थित करत सरकार समाजाला केवळ खेळवत ठेवण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली. नागपुरात विदर्भातील सर्व ओबीसी संघटनेची रविभवन येथे उद्या सोमवारी अकरा वाजता बैठक होणार आहे. यात ४० संघटना असणार आहे. १० दिवसात आरक्षण देता येते का? पुन्हा तोंडाला पान पुसली जातात. आता ही जवाबदारी सरकारची आहे. मात्र त्यांनी ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर येईल असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा : “आरक्षणाची मागणी करणाऱ्या समाजात भाजप दुफळी निर्माण करतेय”, नाना पटोले यांची टीका; म्हणाले, “मराठा आरक्षणावर…”

जरांगे हे श्रद्धेय फडणवीस म्हणत असतील आणि दुसऱ्यांना एकेरी भाषेत बोलत असतील. त्यांनी कुणाकुणाचा पान उतारा केला याची यादी आहे आमच्याकडे, आता ते नैतिकतेचे धडे शिकवत आहे. वारंवार भूमिका बदलणारे अनेक नेते तयार झालेले आहे. रंग बदलू मंडळींची महाराष्ट्रात भर पडत आहे. सदावर्ते हे सरकारची भाषा बोलत आहेत, हे लपून नाही, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.