नागपूर : प्रभू श्रीरामाने जिच्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवला, त्या खारुताईच्या पाठीवर पट्टे उमटले. मात्र, अमरावती शहरातील खारुताईच्या पाठीवरील हे पट्टेच हरवले आणि ही खार चक्क पांढरी झाली. सीतेला रावणाच्या लंकेतून सोडवण्यासाठी श्रीराम, लक्ष्मण, हनुमान यांच्यासह वानरसेना निघाली. लंकेत जाण्यासाठी समुद्र पार करणे आवश्यक होते. त्यांनी सेतू बांधायचे ठरवले. सर्व वानर मोठे मोठे दगड आणुन त्यावर श्रीराम असे प्रभुचे नाव लिहुन समुद्रात टाकत होते. सेतु आकार घेत होता. अशात एक छोटीशी खार तिच्या इवलुशा हातात बसेल असे छोटे दगड नेऊन त्यावर टाकत होती. इतर वानरांना जेव्हा तिची धडपड दिसली तेव्हा ते हसायला लागले व म्हणाले, ‘तुझ्या छोट्या दगड मातीने पुलात काय भर पडणार आहे? तु उगाच धडपड करू नकोस.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रभु श्रीरामांनी हा संवाद ऐकला. ते वानरांना म्हणाले. ‘फक्त मोठे काम करणे महत्वाचे नसते. चांगल्या भावनेने आपल्याला जे योगदान शक्य असेल ते करणे महत्वाचे. आपल्याकडे जास्त क्षमता असेल म्हणुन दुसऱ्यांना सत्कार्य करण्यापासुन रोखु नये.’ वानरांनी क्षमा मागितली. प्रभू श्रीरामाने खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि तिच्या शरीरावर काळे पट्टे उमटले. असे म्हणतात की आधी खारीचे शरीर एकाच रंगाचे होते, प्रभु श्रीरामांनी प्रेमाने हात फिरवला तेव्हापासून खारीच्या अंगावर हे पट्टे दिसतात.

हेही वाचा : ‘एमपीएससी’च्या १८ आणि २५ ऑगस्टच्या परीक्षा पुढे ढकलण्यावर आयोगाच्या सचिव काय म्हणाल्या?

अमरावती शहरात गेल्या दोन महिन्यांपासून गाईच्या गोठ्यामध्ये चक्क पांढरी खारुताई आढळून येत आहे. अजय यादव यांच्या गाईच्या गोठ्यामध्ये ही लाल रंगाचे डोळे असणारी खारुताई गोठ्यामधील गाईच्या अंगावर चढते, तिच्यासोबत खेळते. गाईला मिळणाऱ्या अन्नातून आपले अन्नदेखील शोधते. गोठ्यात कुणीही नसले की सर्वसामान्य खारुताईसोबत ही पांढरी खारुताई इकडून तिकडे उड्या मारत धमाल मजा करते. गायीच्या गोठ्या लगत असणाऱ्या झाडांवर देखील तिचा अनेकदा मुक्काम असतो.

हेही वाचा : Video: स्टंटबाजी भोवली! तलावाच्या भिंतीवर चढून मस्ती; एक बुडाला, दोघे बचावले

शरीरात असणाऱ्या रंगद्रव्याच्या अभावामुळे आणि हार्मोन्स चेंजमुळे तिचा रंग पांढरा झालाय. या प्रकाराला अलबिनिझम असे म्हणतात. आपण नियमित बघतो त्या खारुताई आणि या खारुताईत कुठलाच फरक नाही, अशी माहिती ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांनी दिली.

अमरावती शहरात नऊ वर्षांपूर्वी देखील पांढऱ्या रंगाची खारुताई आढळली होती. ठाणे जिल्ह्यातील गुहागरमध्ये देखील पांढरी खारुताई आढळल्याची नोंद आहे.