गोंदिया : राज्यात महाविकास आघाडी असली तरी गोंदिया जिल्ह्यात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही केल्या जुळत नाही. प्रत्येक निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी तयारच असतात. त्याची प्रचिती नुकत्याच झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर दिसून आली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेच्या गृह जिल्ह्यातच महाविकास आघाडी यामुळे अस्तित्वात येऊ शकली नाही त्याचा फायदा घेत भाजपाने आपल्या सोईनुसार राष्ट्रवादीशी युती करून जिल्ह्यातील सात बाजार समित्यांपैकी सहा जागांवर विजय मिळून आपले जिल्ह्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

हेही वाचा – नागपूर : ब्रिटिश येण्यापूर्वी भारतात सर्वत्र साक्षरता होती; लेखिका साहना सिंह यांचा अजब दावा

एकमात्र गोंदिया बाजार समितीत अपक्ष आमदार विनोद अग्रवालसोबत युती करून चाबी संगठन – काँग्रेसने सत्ता मिळवली. जिल्ह्यातील उर्वरित आमगाव, सडक अर्जुनी, गोरेगांव, देवरी, तिरोडा व अर्जुनी मोरगाव या सहा बाजार समित्यांवर भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून आपला झेंडा रोवला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांच्यातील राजकीय वैर, अंतर्गत मतभेद व वैमनस्य याचा फायदा घेत भाजपाने बाजार समितीत राष्ट्रवादीशी युती करण्याचा डाव खेळला आणि त्यात त्यांना भरघोस यशही मिळाले.

हेही वाचा – वर्धा : ‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; ट्रक उलटला

गोंदिया भंडारा या दोन्ही जिल्ह्यात सुमारे अशीच परिस्तिथी राहिली. देवरी बाजार समितीत तर महाविकास आघाडी अस्तित्वात येऊ शकत नाही हे हेरून विधमान आमदार सहेसराम कोरेटी यांना भाजपाच्या माजी आमदार संजय पुरामसमोर नागी टाकावी लागली असल्याचे चित्र उभे राहिले. शेवटी तीन जगांच्या मोबदल्यात संपूर्ण निवडणूक अविरोध करण्याची नामुष्की ओढवावी लागली.

Story img Loader