नागपूर : राज्याच्या वनखात्याला वाढलेले वाघ सांभाळता येत नाही. मानव-वन्यजीव संघर्ष त्यांना अजूनपर्यंत थांबवता आलेला नाही. संघर्ष झाला की गावकऱ्यांचा आक्रोशाला सामोरे जाण्याऐवजी त्या वाघाला जेरबंद करायचे, असेच धोरण खात्याच्या अधिकाऱ्यांनी राबवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठ दिवसात तीन वाघांना जेरबंद केले असून याच निर्णयामुळे एका वाघाचाही जीवही गेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील मानव-वन्यजीव संघर्ष गेल्या दशकभरात शिगेला पोहोचला आहे. संरक्षित वाघांच्या स्थानांतरणाचा निर्णय वर्षभरापूर्वी घेण्यात आला, पण ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. वाघाने माणसाचा बळी घेतला की त्याला जेरबंद करायचे, हीच मोहीम सध्या वनखात्याने सुरू केली आहे. एकदा जेरबंद केलेला वाघ मग कायमचा जेरबंद झाला तरीही त्याकडे लक्ष दिले जात नाही. निमढेला परिसरातील वाघ धुमाकूळ घालतो म्हणून त्याला जेरबंद करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) खडसंगी परिक्षेत्रातील भानुसखिंडी वाघिणीच्या बछड्याने निमढेला उपक्षेत्रातील जंगला लगत व गावामध्ये धुमाकूळ घालून तीन लोकांना ठार केले. यात बेंबळा येथील सूर्यभान कटू हजारे, निमढेला येथील रामभाऊ रामचंद्र हनवते आणि खानगाव येथील अंकुश श्रावण खोब्रागडे या तीन ग्रामस्थांचा समावेश होता. या वाघाला पकडण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रसंचालक जितेंद्र रामगावकर, बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक, सहाय्यक वनसंरक्षरक श्री. वाठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रेस्क्यू ऑपरेशन’ करण्यात आले. शनिवारी, १८ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान वनपरिक्षेत्र (बफर) खडसंगी परिक्षेत्रातील नियतक्षेत्र निमढेला मधील कक्ष क्रमांक ५९ मध्ये भानुसखिंडी वाघाच्या बछडयाला पकडण्यात आले.

हेही वाचा…“हॅलो, तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करायचे आहे…” एक फोन अन् ४ लाख २५ हजाराचा फटका…

वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्यासोबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, पोलीस नाईक (शुटर) अजय मराठे, जीवशास्त्रज्ञ राकेश आहुजा तसेच रॅपिड रेस्क्यू चमूचे सदस्य दीपेश टेंभुर्णे, योगेश डी. लाकडे, गुरुनानक. वि. ढोरे, वसीम. एन. शेख, विकास ऐस. ताजने, प्रफुल्ल एन. वाटगुरे, ए. डी. कोरपे, वाहन चालक, ए. एम. दांडेकर, तसेच क्षेत्र सहाय्यक एम. के. हटवार, क्षेत्र सहाय्यक आर. जे. गेडाम, क्षेत्र सहाय्यक के. बी. गुरनुले, वनरक्षक एस. बी. लोखंडे, वनरक्षक. डी. ए. बोपचे, वनरक्षक जी. एम. हिंगनकर, वनरक्षक ए. के. ढवळे, वनरक्षक आर. जी. मेश्राम, वनरक्षक सी. एन. कोटेवार, वनरक्षक एस. एस. टापरे, वनरक्षरक डी. आर. बल्की यांनी या मोहिमेत भाग घेतला. सध्या वाघाची प्रकृती बरी असून त्याला गोरेवाडा येथे नेण्यात आले.