नागपूर : पुणे येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कनिष्ठ ॲथलेटिक्स स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील खेळाडूंचे वर्चस्व बघायला मिळत आहे. नागपूरमधील खेळाडूंनी स्पर्धेत दमदार कामगिरी करत आतापर्यंत सहा सुवर्णपदक, तीन रौप्यपदक आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे.

अठरा वर्षाखालील मुलींच्या ४०० मीटर धावणी स्पर्धेत महात्मा गांधी इंग्लिश मीडियम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची कशिष भगतने सुवर्ण पदक प्राप्त केले. याच वयोगटात एक हजार मीटर स्पर्धेत हिंदू मुलींच्या शाळेची जान्हवी हिरुडकर सुवर्ण पदक प्राप्त केले. १०० मीटर हर्डल्स स्पर्धेत नवमहाराष्ट्र क्रीड़ा मंडळच्या संयोगिता मिसर ने १६.७८ सेकंद वेळेसह कांस्य पदक प्राप्त केले तर सुवर्ण मुंबईच्या नेहाली बोरावाले (१५.०६ सेकंद) व रौप्य साताराच्या अभिलाषा वाघमारे (१६.१९ सेकंद) हिने प्राप्त केले.

हे ही वाचा…अखेर ‘तो’ वादग्रस्त सहायक पोलीस उपनिरीक्षक निलंबित, काय घडले?

वीस वर्षाखालील मुलींच्या थाळीफेक स्पर्धेत बी के सी पी कन्हान शाळेच्या आयेशा नसिम ने ३१.५९ मीटर सह कांस्यपदक प्राप्त केले. वीस वर्षांखालील मुलींच्या गटात ४०० मीटर हर्डल्स स्पर्धेत नव-महाराष्ट्र क्रीड़ा मंडळच्या भुवनेश्वरी मसराम हिने रौप्यपदक पटकाविले ट्रॅक स्टार अॅथलेटीक्स क्लबच्या चैताली बोरेकर ने १५०० मीटर धावणी स्पर्धेतत सुवर्ण पदक प्राप्त केले. तीन हजार मीटर स्टिपलचेस स्पर्धेत अंजली मडावीने कांस्य पदक प्राप्त केले. १८ वर्षाखालील मुलांचे गोळाफेक शर्यतीत खेल फाउंडेशनच्या अभिमन्यु कुशवाहने १६.३२ मीटर फेंकीसह सुवर्ण पदक प्राप्त केले. याच वयोगटात एक हजार मीटर स्पर्धेत ओम साई स्पोर्टिग क्लबच्या हर्षल जोगे ने सुवर्ण पदक प्राप्त केले.

हे ही वाचा…नागपूर :‘ॲडव्होकेट अकॅडमी’ला शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी, भूमीपूजनच्या आधीच…

वीस वर्षांखालील मुलांच्या गटात ४०० मीटर हर्डल्स स्पर्धेत रायझिंग स्प्रिटंर्सचा प्रज्वल धनरे ने रौप्य पदक प्राप्त केले. याच वयोगटात १५०० मीटर धावणीत ट्रॅक स्टार अॅथलेटीक्स क्लबचा व जिल्हा संघाचा कर्णधार समित टोंग याने सुवर्ण पदक प्राप्त केले. नागपूर जिल्हा संघाचे प्रशिक्षक रामचंद्र वाणी तर संघ व्यवस्थापक अक्षय पाल हे पुणे येथे खेळांडूना स्पर्धेत प्रशिक्षण देत आहेत, अशी माहिती नागपुर जिल्हा अॅथलेटीक्स संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी यांनी दिली. खेळाडूंनी मिळविलेल्या यशाबद्दल जिल्हा अॅथलेटीक्स संघटनेचे गुरुदेव नगराळे, नागेश सहारे, डॉ. संजय चौधरी, उमेश नायडू, शेखर सूर्यवंशी, डॉ. विबेकानंद सिंह, एस. जे. अन्थोनी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.