नागपूर : पूर्वी राजकारणात वेगवेगळय़ा राजकीय पक्षांतील नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी मनभेद नव्हते. मात्र आज राजकारणात वेगवेगळय़ा पक्षांचे लोक एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला लगावला.फडणवीस नागपुरात शनिवारी आयोजित एका दैनिकाच्या कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि जवाहरलाल दर्डा यांचे चांगले संबंध होते. मात्र पुढे काही दिवसांनी काही कारणांनी त्यांना वेगळे व्हावे लागले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरीही दर्डा यांनी अग्रलेखातून वसंतराव नाईक यांची स्तुती केली होती. ते विचाराने वेगळे झाले, मनाने नाही, असे त्यांचे संबंध होते. पक्षाच्या आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांची मैत्री होती. मात्र आजच्या राजकारणात हे बघायला मिळत नाही. लोक पक्षाबाहेर गेले की ते एकमेकांचे शत्रू असल्यासारखेच वागतात. राजकारणात वैचारिक विरोध असावा, मात्र व्यक्तीचा विरोध नको, असेही फडणवीस म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In politics people behave as if they are each other enemies devendra fadnavis challenge to the opposition parties amy