नागपूर : पूर्वी राजकारणात विविध राजकीय पक्षातील नेत्यांचे वैचारिक मतभेद असले तरी मनभेद नव्हते. मात्र आज राजकारणात नेते परस्परांचे शत्रु असल्यासारखे वागतात, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नागपुरात एका कार्यक्रमात ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि जवाहरलाल दर्डा यांचे चांगले संबंध होते मात्र पुढे काही दिवसांनी काही कारणांनी वेगळे व्हावे लागले त्यावेळी दर्डा यांनी अग्रलेखातून वसंतराव नाईक यांची स्तृती केली होती. विचाराने वेगळे झालो असलो तरी मनाने मात्र वेगळे झाले नाही असे त्यांचे संबंध होते. पक्षाच्या आणि राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांची मैत्री होती. विरोध हा वैचारिक असतो व्यक्तीचा नसतो मात्र आजच्या राजकारणात हे बघायला मिळत नाही. लोक पक्षाबाहेर गेले ती ते एकमेकाचे शत्रु असल्यासारखेच वागतात, असे फडणवीस म्हणाले.
राजकारणात विचारांचा विरोध असावा; व्यक्तिगत नको, काय म्हणाले फडणवीस…
पूर्वी राजकारणात विविध राजकीय पक्षातील नेत्यांचे वैचारिक मतभेद असले तरी मनभेद नव्हते.
Written by लोकसत्ता टीम
नागपूर
First published on: 18-02-2023 at 16:41 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In politics there should be opposition ideological differences devendra fadanvis vmb 67 ysh