नागपूर : एखादे कुटुंब मांसाहार करते. त्यांच्यासाठी तो आवडीचा विषय असू शकतो. त्यांना मांसाहार चवदार वाटत असेल तर त्यात काहीही वाईट नाही. त्यांनी मांसाहार करायला हवा, असा उपदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर येथील एका कार्यक्रमात जगदगुरू शंकराचार्य कूडली श्रृंगेरी महा संस्थान, दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठाचे ७२ वे पिठाधीश श्री अभिनव शंकर भारती महास्वामी यांनी दिला.
अभिनव शंकर भारती महास्वामी पुढे म्हणाले, नियमित मांसाहार करणे योग्य नाही. त्यावर नियंत्रण हवे. नियमित मांसाहार केल्याने प्राण्यांमध्ये असलेले भाव व्यक्तीच्या शरीरात येतात. मांसाहार प्रत्येक दिवशी करायला नको म्हणून शुक्रवार, शनिवार असे दिवस पाळण्यात आले. आधी केवळ जिभेची चव पुरवण्यासाठी मांसाहार केला जात होता. मात्र, आता मांसाहारामध्ये प्रसादाचा भाव आला आहे. आजच्या संशोधनामुळे या गोष्टी माहिती झाल्या.
हेही वाचा…सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, पोलीस लवकरच….
दीपक चोपडा यांनी यावर संशोधन केले आहे. ते मांसाहार खाण्यामध्ये कसा भाव आला यावर सविस्तर माहिती देतात. केवळ खाण्याच्या वस्तूऐवजी मांसाहारामध्ये प्रसादाचा भाव ठेवून तो स्वीकार केल्यास त्या वस्तूमधील गुण बदलतात. उंदरांवर असे एक संशोधनही झाले आहे, असेही अभिनव शंकर भारती महास्वामी म्हणाले. भारतीय जीवन पद्धतीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यामागे केवळ सामाजिक कारण नाही तर शास्त्राची सूक्ष्मदृष्टी आहे. त्यामुळे हे सूक्ष्म शास्त्र समजूून घेणे फार आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.