लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर: नागपूरची संक्रांत पतंग उडविण्याचा छंदा मुळे प्रसिद्ध आहे. त्याला अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. येथे सहकुटुंब पतंग उडविली जाते, पेचा लावला जातो. पतंग कापली जाते. ओ काट म्हणत एकच जल्लोश केला जातो. अलीकडच्या काही वर्षांत पतंग उत्सवाला नॉयलॉन मांजामुळे गालबोट लागले. कापलेल्या पतंगचा मांजा गळ्यात अडकल्याने अनेकांचे जीव गेले, गंभीर दुखापती झाल्या. सरकारने नॉयलॉन मांजावर बंदी आणली. तरी त्याची छुपी विक्री सुरूच आहे. यंदाही संक्रांतीच्या पहिल्या दिवशी चाळीस जणांना मांजामुळे दुखापत झाली. अशाच एका प्रसंगाला तोंड दिलेल्या नागपूरकर नागरिकाची ही आपबिती.

राजू वाघ हे मानेवाडारोडवरील उदय नगर जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र जवऴून सायंकाळी ४:३० ते ५ दरम्यान जात असताना त्यांना मांजाचा अनुभव आला.ते म्हणाले, रस्त्यावरून जात असताना कटलेल्या पतांगचा लांबच लांब धागा माझ्या खांद्याला घासत गेला. घाबरून हात झटकताच हाताला पतांगीचा मांजा लागला. बघतो तर तो नायलॉन मांजा होता, पायी चालत होतो म्हणून वाचलो. दुचाकी किंवा सायकलने जात असतो आणि मांजा गळ्यात अडकला असतातर कदाचित याच मांजाने गळा कापला गेला असता.

आणखी वाचा-चंद्रपूर : बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलाचा वीज पुरवठा खंडित

प्रश्न हा आहे की पोलीस विभागाने निर्देश दिले, जनजागृती केली तरीही नायलॉन मांजा विकणारे पोलिसांच्या सूचनांना घाबरत नाही. कारण ज्याना पोलिसांनी नायलॉन मांजा विकताना पकडले त्यांना केवळ दंड केले असणार. शिक्षा केली नाही केवळ दंड बसवला तो तर आम्ही केव्हाही भरू शकतो असा समज विक्रेत्यांना झाला असावा.परंतु नायलॉन मांजामुळे कोणत्याही निष्पाप व्यक्तीचा अल्पवयात जीव जाऊ नये कुणीही जखमी होऊ नये याकरिता नायलॉन मांजा विक्रेत्यांना मोठी शिक्षा व्हावी, अशी मागणी वाघ यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In recent years the kite festival has been marred by nylon netting cwb 76 mrj
Show comments