बुलढाणा : सलग सुट्ट्या व नवीन वर्षाचे औचित्य साधून लाखो भाविक संतनगरी शेगावात दाखल झाले. वर्षाअखेर (दि ३१) मंदिर रात्रभर खुले राहिल्याने भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतले. यामुळे ‘गण गण गणात बोते’च्या गजराने मंदिर परिसर दुमदुमला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गजानन महाराज मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई, मूर्ती व मंदिर परिसरात केलेली सजावट, संस्थानतर्फे करण्यात आलेली व्यवस्था, रात्रभर भाविकांच्या सेवेत तैनात शेकडो सेवेकरी असा रविवारच्या रात्रीचा थाट होता. कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता जिल्हा, विदर्भसह राज्यातील हजारो भक्तांनी समाधीस्थळाचे दर्शन घेतले. मंदिर व आजूबाजूचा परिसर भाविकांनी गजबजल्याचे दिसून आले. हजारो भाविकांनी आपल्या लाडक्या दैवताजवळ नवीन वर्षाचा संकल्प बोलून दाखविला.

हेही वाचा – ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’मुळे हवामानात बदल, महाराष्ट्रावर पावसाचे सावट

हेही वाचा – नागपूर : मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वडिलांना का जावे लागले न्यायालयात? वाचा काय आहे प्रकरण…

शनिवार व रविवार पाठोपाठ आज सोमवारी नवीन वर्षानिमित्त संतनगरी भाविकांनी गजबजल्याचे दिसून आले. राज्यभरातील भाविक नववर्षारंभाला श्रीचरणी नतमस्तक होतात. आज सोमवारी सकाळीदेखील भाविकांच्या दीर्घ रांगा कायम होत्या. यामुळे दर्शनासाठी अडीच तास लागत आहे. मुखदर्शन वीसेक मिनिटांत होत असल्याचे चित्र आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In shegaon thousands of devotees started the new year by having darshan of sant gajanan maharaj scm 61 ssb
Show comments