नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे.राज्यात संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र त्यातच आता काही ठिकाणी मतदान प्रक्रियेला ग्रहण लागले आहे. नागपुरात काही ठिकाणी मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी ईव्हीएम मशीन बंद असल्याची घटना घडली आहे.

त्यामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात बुथ क्रमांक १८२ व्हेटरनरी काॅलेज मध्ये सकाळी २० मिनिटांहून अधिक काळ ईव्हीएम मशीन बंद पडले होते. यामुळे येथे अनेक मतदार हे ताटकळत होते. या विधानसभा मतदारसंघात अनेक नागरिक हे सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लावून उभे होते. मात्र ईव्हीएम मशीन बंद असल्याने नागरिकांचा खोळंबा झाला. यानंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. हे ईव्हीएम मशीन सुरू होईपर्यंत मतदानासाठी आलेले नागरिक आणि महिला बाहेर थांबून होते.

हेही वाचा…अकोला जिल्ह्यात २९.८७ टक्के, तर वाशीम जिल्ह्यात २९.३१ टक्के मतदान

नागपुरातील इतर मतदारसंघात देखील मतदानयंत्र खराब झाल्याच्या तक्रारी आहेत. तर इमामवाडामधील एका मतदान केंद्रावर सध्या गडपायले यांचे नाव गहाळ असल्याची तक्रार केली. त्यांचे यापूर्वी कस्तुरबा स्कूल, इमामवाडा येथील मतदान केंद्रावरील यादीत नाव राहायचे आहे. यावेळी मात्र नाव गहाळ झाले आहे. मात्र, त्यांच्या पतीचे नाव यादीत आहे. त्यांच्या सासरे मरण पावले आहेत. त्यांचे देखील नाव यादीत आहे.

हेही वाचा…Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यातील ४५ हजारांवर गोवारी मतदारांचा मतदानावर बहिष्कार; कारण…

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होत आहे. येत्या २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. राज्यात महायुतीचे सरकार येणार की महाविकास आघाडीचे की इतरांच्या मदतीने कुणाचे सरकार येणार हे लवकरच स्पष्ट होईल.