नागपूर : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असला तरी राज्यात उन्हाच्या झळा कायम आहे. तर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे राज्यात काही भागांत उन तर काही भागांत हलक्या पावसाची हजेरी आणि काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे.

विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच मुंबई आणि पुण्यात तापमानाचा पारा वाढला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुसंख्य जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हाचा पारा वाढल्याने उकाड्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. राज्यातील आणि विशेषकरून विदर्भातील कमाल तापमानाचा पारा ३५ ते ३६ अंश सेल्सिअसजवळ आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ३४ अंश सेल्सिअसवर एवढे आहे.

Improvement in air quality in Mumbai
मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Maharashtra temperature rise news in marathi
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, पुढील २४ तासात असे असेल तापमान
pavana dam
पिंपरी : उन्हाचा चटका वाढला; पवना धरणात किती आहे पाणीसाठा?
weather department predicts rising temperatures in Mumbai with increased afternoon heat expected
मुंबईतील तापमानात वाढ होण्याची शक्यता
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
nashik water news marathi
नाशिक जिल्ह्यात ३५७ गावांत वैयक्तिक विहिरी, विंधनविहिरींवर बंदी; १५ पाणलोट क्षेत्रात भूजलाचा बेसुमार उपसा
weather forecast maharashtra Summer heat cold February maharashtra weather department
फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा, राज्यातील थंडी संपली? हवामान विभागाचा अंदाज काय?

हेही वाचा – शरद पवार-प्रकाश आंबेडकरांमध्ये चहा पितांना गडबड! रामदास आठवले म्हणाले…

हेही वाचा – नागपूर : ‘या’ दलाचे दोन हजार सैनिक दीक्षाभूमीच्या सुरक्षा व्यवस्थेत, ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा

विदर्भात मागील दहा दिवसांपासून पारा सरासरी ३५ अंशांवर आहे. राज्यातून मोसमी पाऊस माघारी फिरल्यावर हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे सूर्यप्रकाश थेट जमिनीवर येऊन तापमानात वाढ होत आहे. ही स्थिती २५ ऑक्टोबरपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, ऑक्टोबरनंतर राज्यात थंडी पडण्यास सुरुवात होईल.

Story img Loader