नागपूर : ‘इक हसीं निगाह का दिल पे साया है जादू है जुनून है कैसी माया है, ये माया है..’ हे गाणे ‘माया मेमसाब’ या चित्रपटातील. पण ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची सम्राज्ञी म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या ‘माया’ या वाघिणीला ते तंतोतंत लागू होणारे. एक वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ती ताडोबा तलावाजवळील पंचधारा क्षेत्रामध्ये गस्त करत असलेल्या क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांना दिसली. राज्यातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून आठ वर्षांपूर्वी ‘जय’ नामक वाघ असाच बेपत्ता झाला होता. ‘माया’ ही ताडोबाची सम्राझी असेल तर ‘जय’ हा देखील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा सम्राट होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागझिरा अभयारण्यातून २०१३ मध्ये उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात स्थलांतरित झालेल्या या वाघाने जागतिक व्याघ्रपर्यटनाच्या नकाशावर उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचे नाव कोरले होते. एप्रिल २०१६ हे त्याचे शेवटचे दर्शन. जेवढ्या लवकर तो वन्यजीवप्रेमींच्या नजरेत भरला, तेवढ्याच वेगाने तो बेपत्ता झाला. त्याच्या मृत्यूवर वन्यजीवप्रेमींनी शिक्कामोर्तब केले असले तरीही गेल्या आठ वर्षात वनखात्याने त्याची कबूली दिली नाही. हाच कित्ता आता ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘माया’ या वाघिणीबाबत गिरवला जाण्याची दाट शक्यता आहे. २३ ऑगस्ट २०२३ला ती शेवटची दिसली, पण तेव्हापासून तिचा काहीच ठावठिकाणा नाही. तिला शोधण्यासाठी वनखात्याने प्रयत्न केले खरे, पण ते अपूरे पडले. दोन महिन्यानंतर तिच्याच अधिवासात एका प्राण्याचा सांगाडा सापडला. त्यावेळी हा मायाचाच असावा असे खात्रीलायक मत खात्यातीलच काही अधिकाऱ्यांनी बोलून दाखवले होते. नंतर काय चक्रे फिरली कुणास ठाऊक आणि फॉरेन्सिक तपासणीनंतर तो सांगाडा या वाघिणीचा नाही तर दूसऱ्या प्राण्याचा असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर तिच्याविषयी खात्यात बोलणेही बंद झाले. जसे ‘जय’ या वाघाबाबत झाले.

हेही वाचा : अनधिकृत वीज पुरवठा : तर गणेशोत्सव मंडळांवर कारवाई… महावितरण म्हणते…

‘माया’ची कहाणी

या वाघिणीचा जन्म डिसेंबर २०१० मध्ये झाल्याची नोंद आहे. जून २०१४ पासून ती पहिल्यांदा गर्भवती झाली. त्यानंतर २०१५, २०१७, २०२० आणि २०२२ अशा पाच वेळा तिने मातृत्त्वाचा सुखद अनुभव घेतला. ती बेपत्ता झाली तेव्हा वयाची १३ वर्ष तिने पूर्ण केली होती. ती उतार वयाकडे झुकली होती. तिचा एक डोळा अंधूक झाला होता. या उतारवयात तिची कुणाशी लढाई झाली की तिला आयुष्यातून उठावे लागले, हे कोडे अजूनही उलगडलेले नाही. ती अचानक बेपत्ता झाली. एक वाघीण अजरामर कशी होऊ शकते, हे ‘माया’ या वाघिणीवरुन दिसून येते.