नागपूर : वन्यप्राण्यांना त्रासदायक ठरतील अशा वस्तूंपासून व्याघ्रप्रकल्प मुक्त ठेवण्याचा ताडोबा व्यवस्थापनाचा प्रयत्न सातत्याने अपयशी ठरत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात आधी प्लास्टिकच्या बाटल्यांशी वाघ खेळताना आढळून आला होता. आता त्याच व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात वाघाचा बछडा रस्त्याचे काम करणाऱ्या मजुराच्या ‘गमबुटा’शी खेळताना आढळला. त्यानंतर तो मजूराच्या कपड्याशी खेळताना आढळला आणि आता तो पाणी पिण्यासाठी गेला असताना त्यातून चक्क पाण्याची प्लास्टिकची बाटली घेऊन बाहेर आला.

निमढेला बफर क्षेत्रात आतापर्यंत उत्तम व्यवस्थापन सुरू होते. मात्र गेल्या १५ दिवसांपासून या परिसरात व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे. भानूसखिंडी या प्रसिद्ध वाघिणीचा मादी बछडा असलेली नयनतारा तिच्या डोळ्यांमुळे सतत चर्चेत आहे. तीच्या निळ्या डोळ्यांमुळे पर्यटकांनीच तिचे नामकरण नयनतारा असे केले. दोन दिवसांपूर्वी ती जांभूळडोह परिसरातील सिमेंट बंधारा परिसरात दिसली. ती पाणी पिण्यासाठी गेली, पण यावेळी त्या पाण्यातून चक्क तिच्या तोंडाला पिण्याच्या पाण्याची प्लास्टिक बाटली लागली आणि मग पाणी न पिता ती चक्क ती बाटली घेऊन बाहेर आली. हे दृश्य वन्यजीव अभ्यासक दीप काठीकर यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात टिपले.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Girl hugged her mother with the help of AI
VIRAL VIDEO: ‘ती पुन्हा कधीच दिसणार नाही…’ AI च्या मदतीने आईला मारली मिठी, लेकीने शेअर केला व्हिडीओ
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल
savlyachi janu savali fame megha dhade gift to veena jagtap
Video: ‘सावळ्याची जणू सावली’मधील वीणा जगतापला ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीने दिलं सुंदर गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझी मोठी समस्या…”

हेही वाचा : सावधान! ‘स्वाईन फ्लू’ पुन्हा परतला, ‘या’ शहरात गेले दोन बळी

प्रशासनाने प्लास्टिक व कचरामुक्त व्याघ्रप्रकल्प ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, पर्यटकांचा ओघ अधिक असलेल्या या व्याघ्रप्रकल्पात कधी प्लास्टिक बाटल्या तर कधी प्लास्टिकचे वेष्टण आढळतच आहेत. मे २०२३ मध्ये नवेगाव-अलीझंझा बफर क्षेत्रात बबली’ या वाघिणीचे बछडे प्लास्टिकच्या बाटलीशी खेळताना दिसले होते. मुंबई येथील डॉक्टर राहुल महादार यांनी ही छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित केल्यानंतर खळबळ उडाली होती. डिसेंबर २०२० मध्ये जुनाबाई’ वाघिणीचे बछडे प्लास्टिक पिशवीसोबत खेळताना आढळून आले, जानेवारी २०२१ मध्ये अलीझंझा बफर क्षेत्रात वाघिणीचा बछडा प्लास्टिक बाटली उचलतानाचे छायाचित्र समाजमाध्यमावर आले होते, बफर क्षेत्रात व्याघ्रदर्शन होत असल्याने पर्यटकांचा ओढाही इकडेच आहे. बछडे मोठे होत असताना त्यांना कोणत्याही नव्या गोष्टींची उत्सुकता असते. अशावेळी बाटल्या किंवा तत्सम वस्तू त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

हेही वाचा : भंडारा : दोनशेच्यावर संतप्त कामगारांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला, काय आहे कारण जाणून घ्या…

अलीकडच्या निदर्शनास आलेल्या घटना या वाघांच्या बछड्यांबाबतच्याच आहे. निमढेला बफर क्षेत्रात भानूसिखडी’ या वाघिणीचे सुमारे १५ महिन्यांचे तीन बछडे रबरी बुटांशी खेळताना वन्यजीवप्रेमी व छायाचित्रकार संदीप गुजर यांना दिसून आले. त्यावेळी हा परिसर ज्यांच्या अखत्यारित येतो त्या वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी चक्क ते गमबूट वाहत आले असावे, असा हास्यास्पद खुलासा केला.

निमढेलाच्या आजूबाजूला रस्त्यांवर पाणी जाण्यासाठी रपटे तयार करण्यात आले आहेत. दरम्यानच्या काळात हे काम सुरू असतानाच पाऊसही झाला. त्यावेळी ते वाहत आले असावेत, असा हास्यासपद खुलासा त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणात ते आता कोणता खुलासा करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.