गोंदिया: सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम पंचायत वडेगाव येथील सरपंच, उपसरपंचसह दोन ग्राम पंचायत सदस्यांना ७० हजार रुपयाच्या लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करीत ताब्यात घेतले. आरोपी विरुद्ध डूग्गीपार पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तक्रारदार हे बांधकाम साहित्य पुरवठा धारक असून त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण योजने अंतर्गत ग्रामपंचयात वडेगाव येथे सन २०२०-२१ मधे ग्रामपंचयात निविदेनुसार विविध कामाकरीता बांधकाम साहित्य पुरवठा केलेला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तक्रारदाराला पुरवठा केलेल्या बांधकाम साहित्याच्या मंजूर बिलाचे धनादेशकरीता गैर अर्जदार यांनी १५ लाख ५५हजार ६९६ रुपयाच्या रकमेवर पाच टक्के प्रमाणे ७५ हजार रूपयाच्या रकमेची मागणी करुन तडजोडी अंति ७० हजार रुपये पंचासमक्ष मागणी करून लाच प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. आरोपी लोकसेवक यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून स्वत:च्या लाभाकरीता गैरवाजवी फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला. यात आरोपी वडेगाव सरपंच रिना हेमंत तरोने ,उपसरपंच दिनेश सुनील मुनीश्वर,ग्रामपंचायत सदस्य मार्तंड मंसाराम मेंढे , ग्रामपंचायत सदस्य श्रीमती लोपा विजय गजभिये ,सर्व रा. ग्राम पंचायत वडेगाव, तालुका सडक अर्जुनी येथील रहिवासी यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

हेही वाचा… “भक्तांच्या मनातून देव निघत नाही…”, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याने विविध तर्क

सापळा कार्यवाही पो. नि. उमाकांत उगले, पो. नि. अतुल तवाडे, पो. हवा. संजयकुमार बोहरे, मंगेश कहालकर, नापोशि संतोष शेंडे, नापोशि संतोष बोपचे, अशोक कापसे, नापोशि प्रशांत सोनवाने, कैलाश काटकर, नापोशी संगीता पटले, चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the bribery case three people including the sarpanch of vadegaon gondia were arrested sar 75 dvr