बुलढाणा : बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटात काल रात्री उशिरा एका महिलेवर आठ नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. महिलेसोबत असलेल्या इसमाकडे असलेली रक्कम हिसकावून घेत त्यांनी चाकूच्या धाकावर हे घृणास्पद कृत्य केले. पीडित महिले सोबत असलेल्या इसमाने याबाबत  बोराखेडी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पीडित महिलेसह फिर्यादी गुरुवारी( दि १३) संध्याकाळी राजुर घाटात देवीच्या मंदिराच्या परिसरात  थांबले.

यावेळी आठ जणांनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादी जवळचे  ४५ हजार लुटले. त्यानंतर पिडीतेवर अत्याचार केला. आठ जणांपैकी दोघांनी फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून ठेवला होता. नंतर पीडीतेला दरीत नेऊन जबरदस्तीने आठ जणांनी आळीपाळीने अत्याचार केला. आरोपींपैकी एक घटनास्थळाच्या जवळच असलेल्या मोहेगावचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. त्या पीडित महिलेसोबत असलेल्या नातेवाईकाला मारहाणही करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. फिर्यादी पुरुष नातेवाईकांच्या फिर्याद वरून बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेने दिला धक्कादायक जवाब

पीडित महिलेने दिलेला जबाब धक्कादायक व अगदी पोलिसांनाही चक्रावून टाकणारा ठरला आहे. मोताळा न्यायालयात तीने जवाब दिला. जवाबात तिने राजूर घाटातील घटनाक्रम विशद केला.त्यात चेहऱ्यावर रुमाल बांधलेल्या युवकांनी धमकी देत फिर्यादी जवळील ४५ हजार, ओळखपत्र काढून घेतले. तिचा मोबाईल काढून दोघांचे एकत्र फोटो काढून घेत तक्रार दिल्यास बदनामी करण्याची धमकी देऊन आरोपी पसार झाले. आपल्यावर कोणताही लैंगिक अत्याचार व बळजबरी करण्यात आला नाही. मोताळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैधकीय अधिकारी यांच्याकडे वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता, तिने सामूहिक अत्याचार झालाच नसल्याने वैद्यकीय तपासणी करण्याची गरज नसल्याचे स्पष्टपणे लिहून दिले आहे.

Story img Loader