अकोला: पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाने जाहीर केलेल्या ‘सीसीटीएनएस’ गुणांकनामध्ये राज्यातील ४६ घटकांमध्ये अकोला जिल्हा पोलीस दल सातव्या, तर अमरावती विभागात पहिल्या क्रमांकावर झळकला आहे.

पोलीस दलाच्या कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी ‘सीसीटीएनएस’ (क्राईम क्रिमीनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टम) प्रणाली सुरू केली आहे. यात अभिलेख्यांची ऑनलाइन नोंदणी केली जाते. ‘सीसीटीएनएस’ प्रणालीत देशपातळीवरील गुन्हे व माहिती उपलब्ध होते. त्यामध्ये ई-तक्रार, अनोळखी मृतदेह शोधणे, गुन्हे प्रतिबंध कारवाई, वाहनांची पडताळणी करणे, गुन्हे उघडकीस आणणे आदींसाठी ही प्रणाली महत्वाची ठरते.

Mumbai State Labor Insurance Society decided to set up 18 new hospitals for workers
राज्यात ईएसआयसी १८ नवी रुग्णालये उभारणार, रायगडमध्ये सर्वाधिक चार रुग्णालये, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Dombivli illegal hoardings loksatta news
डोंबिवलीत बेकायदा फलक लावणाऱ्या आस्थापनांवर फौजदारी गुन्हे, पाच हजार फलकांवर कारवाई
Police beaten in Nigdi Three arrested
पुणे : निगडीत पोलिसांना मारहाण; तिघे अटकेत
Meter inspector suspended in bribery case
पिंपरी : लाच प्रकरणातील मीटर निरीक्षक निलंबित
BCCI assurance on IPL security fee reduction issue Mumbai news
पोलिसांना लवकरच थकबाकी; ‘आयपीएल’ सुरक्षा शुल्क कपात प्रकरणी ‘बीसीसीआय’चे आश्वासन

हेही वाचा… एमएचटी-सीईटी परीक्षा: संभाव्‍य वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरू होणार परीक्षा

‘सीसीटीएनएस’मध्ये पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांपासून ते तपास व दोषारोपपत्र आदी १८ प्रकारची माहिती उपलोड केली जाते. प्रत्येक महिन्याला गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडून आढावा घेतला जातो. गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पो.महासंचालक प्रशांत बुरडे यांनी जुलै २०२३ महिन्याचा अहवाल जाहीर केला. त्यामध्ये एकूण ४६ घटकांपैकी अकोला पोलीस दलाने २०१ पैकी १७४ गुण ( ८७ टक्के) प्राप्त करून राज्यात सातवा क्रमांक तसेच अमरावती विभागातून प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, नोडल अधीकारी तथा अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.उपनिरीक्षक प्रशांत पाटील, सतीश भातखडे, शुभम सुरवाडे यांनी परिश्रम घेतले.

Story img Loader