नागपूर : वाढत्या महागाईने आधीच नागरिक त्रस्त आहे. आता टोमॅटोने सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवली आहे. कळमना बाजारात टोमॅटोची कमी झालेली आवक बघता शहरातील विविध भागांतील भाजी बाजारात २०० ते २५० रुपये किलोप्रमाणे टोमॅटोची विक्री केली जात आहे.
शहरात मराठा समाजातर्फे रविवारी दुपारी महाल परिसरात ९० रुपये किलो प्रमाणे टोमॅटो विक्री करण्यात आल्यामुळे लोकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. गेल्या काही दिवसांपासून शहरात टोमॅटोची आवक कमी झाली आहे त्यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटो २०० ते २५० रुपयेप्रमाणे विक्रीला आहे. त्यामुळे गोरगरीब लोकांना टोमॅटो खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे अनेकांच्या घरातील भाजीतून टोमॅटो गायब झाले आहे. सामान्य नागरिकांची ही समस्या बघता मराठी सेवा समाजाने गांधीगिरी करत महालातील शिवाजी पुतळा चौकात ९० रुपये किलोप्रमाणे टोमॅटोची विक्री केली.
हेही वाचा – नागपुरात लवकरच ट्रॉली बस सेवा, शहराच्या चार भागांना जोडणार
हेही वाचा – ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात ५३ टक्के पावसाची तूट
यावेळी परिसरातील नागरिकांनी आणि काही चना पोहा नास्ता दुकानदारांनी गर्दी केली होती. प्रत्येकाला १ ते २ किलो टोमॅटो दिले जात होते