गोंदिया: दिवाणी न्यायाधीश व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, गोंदिया यांच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशात नरेश ग्यानीराम श्रीपात्री आणि नईम कुरेशी यांच्या तायक्वांदो असोसिएशन भंडारा यांना स्पर्धेच्या आयोजनावर कायमची बंदी घातली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरेश आणि नईम यांनी तायक्वांदो असोसिएशनच्या नावाने स्पर्धा अनधिकृतपणे आयोजित केली होती. या प्रकरणी अधिकृत गोंदिया जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव दुलीचंद मेश्राम यांनी या दोघांविरुद्ध दिवाणी न्यायालय गोंदिया येथे गुन्हा दाखल केला होता. ९ ऑगस्ट गोंदिया जिल्हा तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२२ गोरेगाव येथे सर्व वयोगटांमध्ये आयोजित केली होती. परंतु ती अनधिकृत होती.

हेही वाचा – धनगर समाजाला पडळकरांचे आवाहन, म्हणाले….

हेही वाचा – बुलढाणा : बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी ५६३ कोटींचा निधी, १४ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचन

तायक्वांदो असोसिएशनने स्पर्धेचे प्रती खेळाडू प्रवेश शुल्क ५०० रुपये दाखवून पैसे उकळले. तसेच तायक्वांदो असोसिएशन यांचे लेटर हेड वापरून आयोजक संस्थेचे नावदेखील छापले होते. मात्र, आयोजक संघटनेची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयात नव्हती. स्पर्धेच्या नावाखाली खेळाडूंची दिशाभूल करून केवळ पैसे उकळण्याचे काम सुरू होते. त्यावर दुलिचंद मेश्राम यांनी आमची असोसिएशन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व इतर शासकीय कार्यालयात अधिकृत आहे. या प्रकारामुळे शासकीय कार्यालयाचीही दिशाभूल करून वसूली अवैध असल्याचे नोटीस मेश्राम यांनी नरेश श्रीपात्री व नईम कुरेशी यांना पाठविले. त्यामुळे गोंदिया जिल्हा तायक्वांदो असोसिएशनद्वारे दिवाणी न्यायालयात या प्रकारची अनधिकृत स्पर्धा आयोजित करण्यावर बंदी घालण्याची याचिका दाखल केली होती. हा खटला १५ महिने चालला, त्यानंतर अनेक साक्षीदार आणि पुरावे सादर करण्यात आले. त्या आधारे न्यायालयाने नरेश श्रीपात्री व नईम कुरेशी यांची तायक्वांदो असोसिएशन बोगस असल्याचा आदेश काढला, त्यामुळे त्यांच्या असोसिएशनवर कायमची बंदी घातली आहे.