देवेश गोंडाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : ‘सबका साथ सबका विकास’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन राज्यात सत्तेत आलेले उपमुख्यमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यामध्ये शिक्षकांची ९०० पदे रिक्त असून तब्बल ७८ शाळांमध्ये एकही शिक्षक नाही.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये २०१२ पासून शिक्षक भरती झालेली नाही. परिणामी, शिक्षकांची रिक्त पदे वाढत असून शाळांचा दर्जा घसरत आहे. खासगी शाळांमधील शुल्क बघता ग्रामीण भागातील सर्वच पालकांना तेथे पाल्यांचा प्रवेश परवडत नाही. म्हणून ते जिल्हा परिषदेचा पर्याय निवडतात. परंतु, शाळांमध्ये शिक्षकच नसेल तर या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यमान उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात शिक्षणाची ही अवस्था असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण हे स्वप्नच
एकीकडे जि.प. शाळांमधील पटसंख्या कमी होत असताना जिथे चांगली पटसंख्या आहे तिथे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे कठीण झाले आहे. यावर उपाय म्हणून नजिकच्या गावातील शिक्षक शून्य शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये येऊन शिकवतात. परंतु, नियमित शिक्षक नसल्याने या विद्यार्थ्यांना हवे तसे शिक्षण मिळत नाही. विशेष म्हणजे, रामटेक, पारशिवनी, हिंगणा या भागातील शाळांमधील पटसंख्या ही शंभर ते दोनशे इतकी आहे. असे असतानाही येथे नियमित शिक्षक नाही.
हेही वाचा >>>बुलढाणा: नाल्याला आलेल्या पुरात बैलगाडीसह तिघे वाहून गेले; दोघे बचावले एक बेपत्ता
काहींवर अतिरिक्त जबाबदारी
जिल्हा परिषदेच्या १५१५ शाळा असून येथे ७२ हजारांवर विद्यार्थी प्रवेशित आहेत. यासाठी ४५०० शिक्षकांची पदे मंजूर असून सध्या तब्बल ९०० पदे रिक्त आहेत. सध्या जिल्हा परिषदेने ६९ शिक्षक स्वयंसेवकांना मानधनावर नियुक्त केले असून २२ शिक्षक आंतरजिल्हा बदलीने आले आहेत. त्यामुळे एक शिक्षक शाळांची संख्या सध्या ७८ वरून ४३ इतकी झाली आहे. त्यानंतरही ८०९ पदे रिक्त आहेत. काही शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत तर, काहींवर अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे.
हेही वाचा >>>पंधरा दिवसातच सिनेअभिनेत्री रविना टंडन दुसऱ्यांदा ताडोबात; दुपारपर्यंत तब्बल अकरा वाघांचे दर्शन
जवळच्या शाळेतील शिक्षकांवर जबाबदारी
जिल्ह्यातील आठ शाळा अशा आहेत जिथे शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यानंतर नवीन शैक्षणिक सत्रासाठी एकही पद भरले गेले नव्हते. या शाळांमध्ये नागपूर तालुक्यातील १, हिंगणा २, नरखेड २, काटोल ७, कळमेश्वर २, सावनेर ७, पारशिवनी ३, रामटेक ९, मौदा १३, कुही १२, उमरेड ६ अणि भिवापूरमधील ४ शाळांचा समावेश आहे. अशा ७८ शाळांमध्ये १६१ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. यातील १५७ पदे रिक्त आहेत. या शाळांवर सध्या मानधनावर शिक्षक स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचा विचार करून मानधन तत्त्वावर ६९ शिक्षक स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर शाळेतील पूर्ण जबाबदारी नसून नजिकच्या शाळेतील शिक्षकांना ते सहकार्य करतात. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा विभागाचा प्रयत्न सुरू आहे.- रोहिणी कुंभार, प्राथमिक शिक्षणाधिकारी.