नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जटायू संवर्धन प्रकल्पाचा शुभारंभ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते पांढऱ्या पाठीचे दहा जटायू पक्षी ‘एवीयरी’मध्ये सोडण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हे भारतातील वाघासाठी प्रसिद्ध असलेले संरक्षित क्षेत्र आहे आणि अशा महत्वपूर्ण क्षेत्रात नष्टप्राय होण्याच्या मार्गावर असणाऱ्या जटायू पक्ष्यांचे संवर्धन केद्र उभारण्यात आले आहे. हे जैवविविधता संवर्धनातील महत्वाची बाब आहे. भारतात जटायूंच्या नऊ प्रजाती आढळतात. यापैकी लांब चोचीचे गिधाड व पांढऱ्या पाठीचे गिधाड हे अतिधोकाग्रस्त प्रजातीमध्ये समाविष्ट आहे. सन १९९० मध्ये गिधाडांची संख्या चार कोटी होती. पण, आता ती संख्या कमी होऊन विविध प्रजाती मिळून सरासरी ५० हजारांवर आली आहे.

हेही वाचा – सर्वत्र श्रीराम गजर, परंतु प्रभू श्रीरामचंद्रचा सहवास लाभलेली तपोवन भूमी दुर्लक्षित; सीतेची नाहणी ही भग्नावस्थेत !

गिधाड हा निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जातो. मृत झालेले प्राणी गावाच्या वेशीवर टाकल्या जात होते आणि अशा मृत प्राण्यांना खाऊन हे पक्षी निसर्ग स्वच्छ ठेवत असे आणि मानवी जीवांना रोगराईपासून मुक्त ठेवत होते. म्हणून, त्यांना निसर्गाचे सफाई कामगार म्हणून ओळखतात. ही जटायू प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गाला मानवनिर्मित डाईक्लोफिनेक नावाचे रसायन आहे. हे रसायन सर्व प्रकारच्या जेल, मलम आणि स्प्रे यामधील प्रमुख घटक आहे. पाळीव गुरांना देण्यात येत असलेल्या औषधामध्ये या रसायनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. मृत झालेल्या देहातून या रसायनाला बाहेर टाकण्यास खूप वेळ लागतो. जटायू या प्राण्यांचे भक्षण करतात. अशा प्रकारे डाईक्लोफिनेक रसायन जटायूंच्या शरीरात जाते आणि परिणामी जटायू मरण पावतात.

जटायूची संख्या कमी होणे जैवविविधता व निसर्ग चक्राला घातक आहे. अशा संकटग्रस्त जटायू पक्ष्याला या क्षेत्रात पुन-प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई यांच्या महत्वपूर्ण पुढाकाराने जटायू संवर्धन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांचे हरियाणामधील पिंजोर येथे गिधाड प्रजनन व संशोधन केद्र सन २००१ पासून कार्यन्वित आहे. या केद्रातून प्रथम टप्यात पांढऱ्या पाठीचे १० पांढऱ्या गिधाड पक्षी रीतसर शासनाच्या परवानगी प्राप्त करून घेऊन ताडोब-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा परिक्षेत्रातील बोटेझरी भागात तयार केलेल्या ‘प्रीरीलीज अव्हीयारी’ मध्ये संशोधकांच्या देखरेखित ठेवण्यात आले आहे. आणि साधारणत: तीन महिन्यांनंतर त्यांना निसर्गमुक्त करण्यात येणार आहेत. या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे अति धोकाग्रस्त असलेल्या या निसर्गातील स्वच्छ दूतांना हक्काचे अधिवास प्राप्त होईल.

हेही वाचा – यवतमाळ राममय : मंदिरे सजली, नागरिक दीपोत्सव साजरा करणार; सुरक्षेसाठी दीड हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त

जटायू संवर्धन प्रकल्प हा अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प असून आपल्या स्वच्छतेच्या दुतांना परत एकदा मोकळ्या आकाशात गगनभरारी मारण्यासाठी मोकळा श्वास देईल आणि यामुळे आपल्या जैवविविधतेमध्ये मोलाची भर पडेल असे महत्वपूर्ण मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. या वर्षीपासून महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर वनभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी घोषणा केली. या जटायू संवर्धन कार्यक्रमाकरिता प्रविणसिंह परदेशी, अध्यक्ष, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई व मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) उपस्थित होते. ताडोबा जसे वाघाचा मुख्य अधिवास आहे व प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे या जटायू संवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्ध होईल आणि निसर्ग पर्यटनामध्ये मोलाची भर पडेल, असे ते म्हणाले.

या कार्यमाकरिता मुख्य अतिथीमध्ये महिप गुप्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), श्किशोर रिठे, संचालक बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, रवींद्र परदेशी, पोलीस आयुक्त, चंद्रपूर जिल्हा तसेच वरिष्ठ वन अधिकारी यांचीही या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जितेंद्र रामगावक, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the tadoba andhari tiger project conservation of vultures along with tigers is now underway rgc 76 ssb
Show comments