चंद्रपूर : नळाप्रमाणे झाडातून पाणी येताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? नसेल तर हे चित्र पहा. हे चित्र जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रातील आहे. जेथे वन कर्मचाऱ्यांनी झाडावर बनवलेल्या ‘ट्यूमर’ जागेवर कुऱ्हाड मारली, त्यानंतर तेथून पाणी येऊ लागले. जे पाहून वनकर्मचाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. मात्र, काही वन कर्मचाऱ्यांनी हात धुवून हे पाणी पिण्याचा आनंदही लुटला. हा व्हिडीओ आज व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासंदर्भात तपास केला असता, हा व्हिडीओ ताडोबा येथे कार्यरत असलेल्या प्रणाली वंजारी या महिला वनरक्षकाने बनवल्याचे समोर आले. पाणी बाहेर आल्यावर तिला स्वतःलाच आश्चर्य वाटले. त्यानंतर झाडातून बाहेर पडणारे पाणी एका वन कर्मचाऱ्यांनी प्यायले. हा व्हिडीओ १३ जानेवारी २०२३ रोजी ताडोबाच्या कोळसा वन परिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक ३०६ मध्ये घेण्यात आला आहे. यासंदर्भात कोळसाचे तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी रुंदन काटकर यांनी सांगितले की, असे अधूनमधून घडते. हे ‘येना’ प्रजातीचे झाड आहे. त्याचे शास्त्रीय नाव ‘टर्मिनालिया टोमॅटोसा’ आहे.

हेही वाचा – पूर्व विदर्भात हिवतापाचे सात बळी, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा

हेही वाचा – यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेत अविश्वासापूर्वीच अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांचा राजीनामा, नवीन फॉर्म्युला कसा राहणार?

काही झाडांच्या प्रजाती उन्हाळ्यात पाणी साठवून ठेवतात. पाण्याचे प्रमाण झाडाच्या घेरावर अवलंबून असते. या पाणीसाठ्याचे तांत्रिक व पर्यावरणीय महत्त्व माहीत नाही. हे फक्त अधूनमधून घडते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the tadoba the forest workers quench their thirst with the water that comes out of the tree rsj 74 ssb