भंडारा : लग्न समारंभात अनुचित घटना घडण्याचे प्रकार हल्ली वाढले आहेत. काहीच दिवसांपूर्वी लग्नात नाचणाऱ्या एका तरुणाला डीजेच्या आवाजाने कायमचा बहिरेपणा आल्याची ताजी घटना असताना आणखी एक प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे.

मंगलाष्टके संपताच वर पक्षांकडील काही अती उत्साही तरुणांनी मंडपाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी सुरू केली. मात्र, त्यांचा हा अतिउत्साह आणि निष्काळजीपणा इतर वऱ्हाड्यांना भोवला. फुटलेले फटाके अंगावर उडून त्यात तीनजण गंभीररित्या जखमी झाले. तुमसर तालुक्यातील विहीरगाव येथील एका लग्न समारंभात हा धक्कादायक प्रकार घडला.

While running in the police recruitment field, two young women clashed, pulled each other's clothes shocking video viral
“अगं काहीतरी भान ठेवा” पोलीस भरतीच्या मैदानात धावतानाच दोन तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन् शेवटी…VIDEO व्हायरल
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Cattle Slaughter Bhandara, Cattle , Marriage ,
भंडारा : धक्कादायक! ‘दावत’साठी मंडपामागेच गोवंशाची कत्तल
ladies group dance on hi navri asli song from navri mile navryalla video
“ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली” नऊवारी साडी नेसून महिलांचा जबरदस्त डान्स; रातोरात VIDEO झाला व्हायरल
Prayagraj Stampede
Mahakumbh Stampede: महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान मोदींचा तीन वेळा योगी आदित्यनाथांना फोन, नेमकी चर्चा काय झाली?
content creator Kadi Tucker fell in love with Vada Pav The recipe was explained in Marathi netizens praised her viral video
परदेशी तरुणी पडली वडापावच्या प्रेमात! मराठीत सांगितली रेसिपी, Viral Video पाहून नेटकऱ्यांनी केलं तोंडभरून कौतुक
Monalisa Maha Kumbh Melas viral star celebrates her birthday in new videos
रातोरात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाने महाकुंभमेळ्यात साजरा केला वाढदिवस! केक कापून केले सेलिब्रेशन, पाहा Video Viral
response on loksatta editorial
लोकमानस : विलंब, नाराजीनाट्यांची मालिका

हेही वाचा – चंद्रपूर : “येथील भूमिपुत्रांना इथेच नोकरी द्या, अन्यथा कोळसा खाणी…”, खासदार बाळू धानोरकर यांचा वेकोलि प्रशासनाला इशारा

मनोहर तुमसरे (५०) रा. कुलपा, सुभाष खडोदे (५०) रा. नागपूर, उमेश चाणोरे (४५) सेलोटी, जि. गोंदिया अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. यापैकी मनोहर तुमसरे यांच्यावर तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर उर्वरित दोघांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

हेही वाचा – अमरावती : दोन तरुण देशी कट्ट्यासह दुचाकीवर फिरून..

तुमसर तालुक्यातील विहीरगाव येथे राजकुमार जांगळे यांच्या मुलीचा विवाह गोंदिया जिल्ह्यातील फुलचुर येथील तरुणाशी २ मे रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. विवाह सोहळ्यात मंगलाष्टके संपताच वर पक्षाकडील तरुणांनी मंडपाबाहेर फटाक्यांची आतषबाजी करीत असताना सदर फटाके अचानकपणे मंडप बाहेर उपस्थित असलेल्या वऱ्हाड्यांच्या अंगावर पडले. यात तीनजण जखमी झाल्याची घटना समोर आली. दरम्यान, येथील नागरिकांनी जखमींना उपचारार्थ तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.

Story img Loader