यवतमाळ: कत्तलीसाठी चारचाकी वाहनासह पायदळ होत असलेल्या आंतरराज्यीय जनावर तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या दोन कारवाईत ३३ जनावरांची सुटका करून १० गुन्हा दाखल करण्यात आला. मुकुटबन पोलिसांनी केलेल्या या कारवाईत ६ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवैधरीत्या चारचाकी वाहनात कोंबून तेलंगणाकडे जात असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यावरून पथक मुकुटबन ते येडशी रोडने जात असताना त्यांना संशयित वाहन दिसले. वाहनाची पाहणी केली असता, १३ गोवंशीय जनावरे आढळून आली. त्यात फयाम गफार शेख (३२, रा. मुकुटबन), सद्दाम उर्फ सय्यद शाकीब महमूद (३२, रा. चिखलवर्धा, ता. घाटंजी), संदीप निंबाजी सोयाम ४१, रा. पिंपरडवाडी), राजू निंबाजी सोयाम (२५) हे बसून होते. ही जनावरे फयाम गफार शेख याच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले. मात्र आरोपी उलटसुलट माहिती देत होते. पोलिसांनी जनावर व वाहन असा चार लाख ६५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा… ७ डिसेंबरपासून खासदार-आमदारांना गावबंदी कशासाठी

दुसरी कारवाई मांगली चौपाटी येथे करण्यात आली. खडकी गणेशपूर येथून काही जण बैल कळपाने पायदळ मांगली मार्गे तेलंगणात घेऊन जात होते. त्यावरून पथकाने मांगली चौपाटी येथे सापळा रचला. १७ बैल, मोबाइल असा एकूण एक लाख ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सचिन महादेव थेरे (३८, रा. तुंड्रा, ता.वणी), देविदास नानाजी भोसकर (४५, रा. तुंड्रा), रमेश शालिक पेंदोर (४१, रा. तुंड्रा), शत्रुघ्न नथ्थू घोफळे (४५, रा. तुंड्रा) हे चारही जण आदिलाबाद येथील अस्लम कुरेशी व सलीम कुरेशी यांच्याकडे जनावरे घेऊन जात होते. दोन्ही कारवाईत १० जणांविरुद्घ मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुडे, योगेश डगवार, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, रजनिकांत मडावी, सतीश फुके आदींनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In two operations of inter state animal smuggling 33 animals were rescued and 10 cases were registered in yavatmal nrp 78 dvr
Show comments