नागपूर : विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे स्थानकावर मिस्ट कुलिंग प्रणाली बसवण्यात आल्याने प्रवाशांना थोडासा दिलासा मिळू लागला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्याचे तापमान सोमवारी ४४ अंश सेल्सिअवर पोहचले होते. ब्रम्हपुरीमध्ये तर ४७ अंश सेल्सिअवरच्या वर तापमान पोहोचले. तर नागपुरात ४५.६ अंश सेल्सिअवर तापमान होते. कडक उन्हाळा असलातरी नियोजित रेल्वे प्रवास टाळता येत नाही. शिवाय बेदरकार उन्हाळामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. यावरून उपाय म्हणून रेल्वेने रेल्वे स्थानकावर ‘मिस्ट कुलिंग सिस्टम’ म्हणजे सुक्ष्म छिद्रातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे धुके निर्माण होऊन वातावरणात गारवा निर्माण होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उष्णतेवर मात करण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर ही प्रणाली बसवण्यात आली असून प्रवाशांना थोडासा का होईना गारवा मिळू लागला आहे. सर्वात उष्ण महिने, एप्रिल ते जून, जेव्हा तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढते. तीव्र उन्हाळ्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबणे असह्य होऊ शकते. यासाठी नागपूर रेल्वे स्थानकाने फलाट क्रमांक १, २ आणि ३ वर अत्याधुनिक मिस्ट कूलिंग सिस्टम बसवण्यात आले आहे.

हेही वाचा : गडचिरोली : जहाल नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण; सहा लाखांचे होते बक्षीस…

नवीन मिस्ट कूलिंग सिस्टम सभोवतालचे तापमान ६ ते ८ अंश सेल्सिअसने कमी करते. त्यामुळे ज्यामुळे प्रवाशांना गारवा जाणवतो आहे. या प्रणालीच्या प्राथमिक घटकांमध्ये उच्च-दाब पंप, सूक्ष्म फिल्टर, एक नियंत्रण प्रणाली, पाइपिंग, फिटिंग्ज आणि विशेष नोझल्स समाविष्ट आहेत. सूक्ष्म छिद्रांतून पाणी निघण्याची प्रक्रिया प्रणालीच्या कार्यक्षमतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. उन्हाळाच्या हंगामात मिस्ट कूलिंग सिस्टम विश्वसनीय आणि प्रभावी ठरत आहे.

हेही वाचा : नागपूर: रात्रीच्या शाळेतील ‘या’ विद्यार्थ्यांचे यश इतरांपेक्षा वेगळे ? काय आहे कारणे

हेही वाचा : विदर्भात ‘सन’ताप ! तापमानाचे नवनवे रेकॉर्ड; नवतपाच्या सुरुवातीपासूनच

मिस्ट कूलिंग सिस्टमचे प्रमुख फायदे

-ओपन-एअर प्लॅटफॉर्मसाठी व्यावहारिक कूलिंग सोल्यूशन प्रदान करते जेथे वातानुकूलन शक्य नाही.
-सोप्या आणि परवडणाऱ्या देखभालीसाठी डिझाइन केलेले, महत्त्वपूर्ण खर्चाशिवाय दीर्घकालीन ऑपरेशन सुनिश्चित करते.
-कमीतकमी वीज वापरते, ज्यामुळे तो पर्यावरणास अनुकूल पर्याय बनतो.
-धूळ, धूर आणि इतर श्वासोच्छ्वास करणारे कण कमी करून हवेची गुणवत्ता सुधारते, प्रवाशांसाठी आरोग्यदायी वातावरण तयार करते.
-कोणत्याही अतिरिक्त जागेची आवश्यकता नाही, विद्यमान फलटावर वरच्या भागात लावणे सोपे असते.
-प्रवाशी आता उन्हाळ्याच्या कडक उन्हातही फलाट क्रमांक १, २ आणि ३ वर गारव्याचा अनुभव घेत रेल्वेगाडीची प्रतीक्षा करू शकतात.