वर्धा : भारताच्या दृष्टीला पुढे नेण्यासाठी १३ मार्च २०२४ रोजी गुजरात आणि आसाम राज्यांमध्ये तीन ठिकाणी सेमीकंडक्टर सुविधांची पायाभरणी करणार आहेत. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात सेमीकंडक्टर मिशन या विषयावर चर्चा झाली. आय.आय.आय.टी. नागपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. निखिल अग्रवाल म्हणाले की जागतिक सेमीकंडक्टर उद्योगात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेले सेमीकंडक्टर मिशन देशाला तांत्रिकदृष्टया स्वावलंबी बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. भारत एक आयटी हब म्हणून ओळखला जातो आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर डिझाइन आणि उत्पादन, क्वांटम कम्प्यूटिंग इत्यादींमध्ये नेतृत्व करण्याचे लक्ष्य आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकारच्या विकसित यावेळी पंतप्रधान विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी आणि युवकांना संबोधित करतील. त्याचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था विद्यापीठाच्या कस्तूरबा, गालिब आणि सप्रे सभागृहात करण्यात आली आहे. या मोहिमेच्या व्यापक प्रचारासाठी विद्यापीठाने सेमीकंडक्टर मिशन या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. अभियानाविषयी बोलताना डॉ. अग्रवाल म्हणाले की सेमीकंडक्टर सुविधेमुळे आपण तांत्रिकदृष्टया पुढे जाऊ आणि स्वावलंबी होऊ. आमच्याकडे संसाधने उपलब्ध आहेत, जी आम्ही आरोग्य सेवा आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात वापरू शकतो. यामुळे डेटा संकलन आणि जलद गणना सुलभ होईल.
हेही वाचा : जेनेरिक औषधांच्या माध्यमातूनही ‘भाजप’चा प्रचार!
महादेवी वर्मा सभागृहात आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलताना अनुवाद व निर्वचन विभागाचे अधिष्ठाता प्रो. कृष्ण कुमार सिंह म्हणाले की भारत सरकारचे सेमिकंडक्टर मिशन हा अतिशय महत्त्वाचा प्रयत्न आहे. सर्वसामान्यांच्या विकासात हे प्रभावी ठरेल आणि शेवटच्या माणसाला स्वावलंबी बनवण्याचे महात्मा गांधींचे स्वप्नही पूर्ण होईल. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी बी.एस. मिरगे यांनी केले तर जनसंचार विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. राजेश लेहकपुरे यांनी आभार मानले.
या प्रसंगी प्रो. अवधेश कुमार, प्रो. अखिलेश कुमार दुबे, प्रो. बंशीधर पांडे, प्रो. जनार्दन कुमार तिवारी, प्रो. प्रीती सागर, डॉ. रामानुज अस्थाना, डॉ. संदीप मधुकर सपकाळे, डॉ. राम प्रकाश यादव, डॉ. मुन्नालाल गुप्ता, डॉ. योगेन्द्र बाबू, डॉ. राम कृपाल, निलेश मुंजे, डॉ. जीतेन्द्र, डॉ. कुलदीप पांडे यांच्यासह शोधार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.