वर्धा : शनिवारी रात्री देवळी व अन्य तालुक्यांना गारांनी झोडपले, तर रविवारी सायंकाळी समुद्रपूर तालुक्यात गारपीट झाली. बोरांच्या आकाराच्या गारांनी शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली. यामुळे बळीराजाचा मेटाकुटीस आला आहे. रविवारी सायंकाळी समुद्रपूर तालुक्यातील मारडा, कळमना, सालापूर, विखणी, दिग्रस या गावांत वरुणराजा गारांसह धोधो बरसला. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एक कोसळलेल्या पावसाने व गारपिटीने चांगलाच कहर केला. देवळी तालुक्यातील इसापूर, रत्नापूर, फत्तेपूर, मुरदगांव, आंबाडा, काजळसरा, खर्डा, सोनोरा, भिडी, विजयगोपाल, इझांळा, कोल्हापूर, रोहणी, यासोबत जिल्ह्यातील इतरही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. गारपीट, पाऊस व वादळी वाऱ्यामुळे गहू पूरता झोपला तर चण्याच्या घाट्या फुटल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात पिकांवर गारांचे आच्छादन पसरले. पावसामुळे शेतात असलेला कापूस ओला झाला. तसेच फळबांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा