वर्धा : प्रशासनातील अधिकार्‍यांकडून जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे ते आमचे मित्र आणि तुमच्या आर्वीचा पुत्र सुमित वानखेडेकडून शिकले पाहिजे. हा पठ्ठा कामासाठी वाघ आहे. सुमित वानखेडे यांनी आर्वी येथे आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण दिले. अनेक वर्षे सोबत काम केलेल्या व्यक्तीला जवळून ओळखत असताना सुमितला नकार देणे शक्यच नव्हते. त्यांनी आयोजित केलेला दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना नवी उर्जा मिळेल, असा विश्वास उच्च व तांत्रीक शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

वर्धा लोकसभा भाजपा निवडणूक प्रमुख सुमित वानखडे यांच्या संकल्पनेतून स्थानिक रुणिक धाम येथे आयोजित दीपावली मिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार रामदास तडस, आमदार दादाराव केचे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, शोभाताई काळे यांच्या सह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व आर्वी शहरातील व्यापारी वर्गासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. ना. पाटील पुढे म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी व्यापारी वर्गाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सुमित वानखेडे यांनी आयोजित केलेल्या या दिपावली मिलन कार्यक्रमातून व्यापार्‍यांसह मतदार संघातील ज्येष्ठांचा सन्मान होतो आहे, हीच भारतीय जनता पार्टीची शिकवन आम्हाला मिळाली असल्याचे ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”
Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
Santosh Deshmukh Murder Case
Devendra Fadnavis : संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

हेही वाचा : आमदार धानोरकर यांनी रोखून धरली ‘कर्नाटक एम्टा’ची वाहतूक…

खा. रामदासजी तडस यांनीही वानखेडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची कौतुक केले. भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, आमदार दादाराव केचे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात सुमित वानखेडे यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत स्तंभ हा व्यापारी आहे. देशाच्या प्रगतीमध्ये व्यापारी वर्गाचा मोठा वाटा आहे त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे आयोजक सुमित वानखेडे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी आर्वी शहरातील गणमान्य प्रतिष्ठित व्यापार्‍यांचा नामदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार रामदास तडस, आमदार दादाराव केचे व सुमित वानखडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला व्यापारी वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन रवी मंशानी यांनी केले तर आभार विजय बाजपेयी यांनी मानले. याप्रसंगी विधानसभा प्रमुख विजय बाजपेयी, बाळा नांदुरकर उपाध्यक्ष भाजप वर्धा जिल्हा, प्रशांत वानखेडे अध्यक्ष भाजप आर्वी तालुका, चक्रधर डोंगरे अध्यक्ष भाजप कारंजा तालुका, कमलाकर निंभोरकर अध्यक्ष भाजपा आष्टी तालुका, जगदीश टावरी, कमलजी मुरारका, दिलीप जसुतकर, मनिष ठोंबरे आदी अनेकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Story img Loader