वर्धा : आज सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क या सेवेचे परीक्षण झाले. दीडशेवर एकर परिसरात ६७३ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारला जात आहे. हा पार्क कसा उपयुक्त ठरेल, हे स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणातून पटवून सांगितले. त्यापूर्वी बोलताना आमदार डॉ. पंकज भोयर यांनी नागपूर ते वर्धा मेट्रो सूरू करण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना गडकरी म्हणाले की, यवतमाळपर्यंत मेट्रो नेण्याचा विचार आहे. नागपूर ते वर्धा हे अंतर केवळ ३५ मिनिटात पार होईल. मात्र शेतकरी कसा सुखी होवू शकतो यासाठी त्यांनी आपल्या पत्नीचे उदाहरण दिले.

हेही वाचा : नागपूर : गोळीबार चौकाला अतिक्रमणाचे ग्रहण, चुकीच्या ‘लँडिंग’मुळे वाहतूक कोंडी

industrial production
औद्योगिक उत्पादन दर ऑक्टोबरमध्ये मंदावून ३.५ टक्क्यांवर सीमित
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Announcements of organic natural farming Know how much the use of urea and other fertilizers has increased Mumbai news
सेंद्रीय, नैसर्गिक शेतीच्या फक्त घोषणाच; जाणून घ्या, युरियासह अन्य खतांचा वापर किती वाढला
Grape
राज्यात ५० हजार एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड ? जाणून घ्या, नोटबंदी, कोरोना टाळेबंदी, नैसर्गिक आपत्तींचा परिणाम
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
amazon smbhav 2024 nitin gadkari
देशातील वाहतूक खर्च निम्म्यावर आणणार – नितीन गडकरी
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?

माझ्याकडे तीन विहिरी आहेत, तेथे बारा तास वीज पुरवठा सुरू असतो. यामुळे माझी साठ एकर जमीन पाण्याखाली आली आहे. माझ्या पत्नीला दोन पुरस्कार मिळाले. एक मिळाला अकरा क्विंटल एकरी सोयाबीन उत्पादन घेतल्याबद्दल. आपल्या भागामध्ये ११० टन ऊस काढणारे शेतकरी आहेत. त्यांना आज हमखास भाव मिळतो. आपल्या इथे आता मदर डेअरी भरपूर सेंटर चालवते. विदर्भातली प्रत्येक गाय वीस लिटर दूध देणारी झाली पाहिजे. वर्धा-नागपूर रेल्वे मार्ग हा देशातील पाचपैकी एक सर्वात बिझी रूट आहे. त्यामुळे वेगळा मार्ग टाकल्या जात आहे. समृद्धीमुळे वेळ कमी झाला. शेतकरी सुखी झाला पाहिजे, हा माझा उद्देश आहे. सिंदीचा हा प्रकल्प सूरू होईल तेव्हा अनेक संधी उपलब्ध होतील. त्या स्थानिक लोकांनी हेरल्या पाहिजे. सिंदी सेलडोह भागात नवी टाउन शिप तयार करण्याचा प्रयत्न करा. हा मार्ग मी चांगला करून देणार, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. खासदार रामदास तडस यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा : “बारामती अजितदादांचीच”, चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले, “भाजपाला आणखी चार जागा…”

दरम्यान, खासदार रामदास तडस तसेच आमदार पंकज भोयर यांनी तर रेल्वे उड्डाण पूल येथे बोर्ड लावले पाहिजे की या कामासाठी किती व कसे प्रयत्न झाले. या दोघांनी केलेले प्रयत्न मी विसरू शकत नाही. या जिल्ह्यातील शेतकरी सुखी झाला पाहिजे, असे आमचे प्रयत्न आहे. या प्रकल्पात प्रत्येक शेतकऱ्यास चांगले घर मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader