वर्धा : धार्मिक व धर्मादाय संस्थांचे अंकेक्षण करतांना लहान मोठ्या संस्थांना एकाच तराजूत तोलू नये, असा सूर येथे आयोजीत कार्यशाळेत व्यक्त झाला. वर्धा सनदी लेखापाल समूहातर्फे या कार्यशाळेचे आयोजन शिक्षा मंडळच्या सभागृहात करण्यात आले होते. शहरातील मान्यवर धार्मिक तसेच विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले. केंद्र शासनाने २०२१, २०२२ व २०२३ च्या अर्थसंकल्पात धर्मादाय संस्थांच्या बाबतीत आयकर लागू करण्यात विविध बदल केले. रिटर्न तसेच ऑडीट अहवालातील तरतूदी अश्या संस्थांवर नियंत्रण ठेवण्याइतपत कठोर झाल्याची भावना आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागीय आयकर आयुक्त कार्यालयाच्या सूचनेने ही कार्यशाळा झाली.

हेही वाचा : नागपूर : बुकी सोंटू जैनची नव्याने चौकशी होणार, शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी

Union Budget 2025 Date Expectations in Marath
Union Budget 2025 : १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प, टॅक्स रिजीममध्ये बदल होणार? निवृत्ती वेतन वाढणार? काय आहेत अपेक्षा?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
Central government decision farming Relief
दहा वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा; जाणून घ्या, केंद्र सरकारने २०१४ नंतर पहिल्यांदाच कोणता निर्णय घेतला?
Income Tax recruitment 2025 Income Tax Department invites applications for Data Processing Assistant posts
Income Tax Recruitment 2025: आयकर विभागात नोकरीची संधी! १ लाख ४२ हजारांपर्यंत मिळू शकतो पगार! जाणून घ्या कोण करू शकते अर्ज
Indrayani river foams before Chief Minister Devendra Fadnavis visit to Alandi
इंद्रायणी पुन्हा फेसाळली; देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देणार का?

उपायुक्त आकाश यादव यांनी धार्मिक व धर्मादाय संस्थांना लागू कर नियमांवर प्रकाश टाकला. आयकर अधिकारी पंकज शास्त्री यांनी नवीन नोंदणी पद्धत सांगितली. तसेच आयकर खात्याचे संदीप गांजे, आरती वकिल, अनिल भाेयर, सुमीत कुमार यांनी प्रश्नोत्तराच्या सत्राचे संचालन केले. प्रसिध्द सनदी लेखापाल राजेंद्र भुतडा यांनी नवे आयकर नियम काही संस्थांसाठी अडचणीचे ठरत असल्याचे निदर्शनास आणले. मोठ्या आणि लहान संस्था फरक करायला हवा. ग्रामीण भागातील अनेक संस्था केवळ सेवाभावी वृत्तीने काम करीत असतात. तर अनेक मोठ्या संस्था मोठी आर्थिक उलाढाल करीत सेवापर कामे करतात. या दोन्ही संस्थांना एकाच ब्रशने रंगविणे योग्य ठरेल काय, असा सवाल भुतडा यांनी केला.

हेही वाचा : नागपुरात होणार विज्ञानाची ‘ही’ परिषद, मिळाले थर्मोडायनामिक्स परिषदेचे यजमानपद

यापूर्वी मोठ्या मोठ्या संस्था आयकर नियमातील पळवाटा शोधून गैरफायदा घेत होत्या. ते होवू नये म्हणून नवीन निर्बंध आले. पण आता त्यात सर्वच भरडले जाणार का. जर संस्थेत पैसा आहे तर तो सेवाभावी कामांवरच खर्च व्हावा. तो जर खर्च झाला नाही तर उलट संस्थेलाच तीस टक्के कर लागणार. लहान गावात काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी सर्वच बाबतीत तरबेज असतात असे नाही. त्यामुळे अहवाल, रिटर्न, खुलासा याबाबत दक्ष असतीलच असे नाही. म्हणून या अडचणी वरिष्ठ पातळीवर मांडल्या जाव्यात, असा सूर कार्यशाळेतून उमटला. निमंत्रक सनदी लेखापाल प्रतीक हरकुटिया व राहुल लेेकरिया यांनी विषयाचे सूत्र मांडले.

हेही वाचा : वर्धा : किडनी प्रत्यारोपणात अव्वल, ‘या’ रुग्णालयाची शतकी कामगिरी

जगदिश चांडक, सौरभ गोयंका यांनी आभार मानले. कार्यशाळेत सेवाग्राम आश्रम, ग्रामसेवा मंडळ, राष्ट्रभाषा समिती, माहेश्वरी मंडळ, लक्ष्मीनारायण देवस्थान, कस्तुरबा हेल्थ सोसायटी तसेच अन्य संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

Story img Loader